नळदुर्ग- अक्कलकोट रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली, पण काही “स्वतःला शेतकऱ्यांचे तारणहार समजणारे” दलाल अचानक जागे झालेत. उमरगा, नळदुर्ग, शहापूरमध्ये फिरणाऱ्या या तथाकथित कैवार्यांचा शेतकऱ्यांच्या हिताशी काहीही संबंध नाही.
दलालांचा मुखवटा फाडला!
- हा मूळचा शहापूरचा दलाल, नळदुर्ग – अक्कलकोट रस्त्यामध्ये याची एक इंचही जमीन गेलेली नाही.
- शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईच्या लढ्यात याचा काहीही संबंध नसताना संघटना स्थापन करून त्यांना फसवत आहे.
- नळदुर्गचा एक पोलीस आणि त्याचा भाऊ देखील या नाटकात सामील!
- या पोलिसाच्या नावावरही सात-बारा उताऱ्यावर कोणतेही जमिनीचे हक्क नाहीत, कब्जा मात्र यांचा आहे!
- संपूर्ण प्रकरण न्यायालयात सुरू असूनही, शेतकऱ्यांकडून पैसा उकळून “आंदोलनाचा” बनाव केला जातोय.
रस्त्याचे काम सुरू होताच दलालांचा हलकल्लोळ!
१२ मीटर रस्त्याचे काम सुरू झाल्यावर हा नवा प्रश्न – “आम्हाला विश्वासात का घेतले नाही?”
अहो, तुम्ही रस्ता मालक आहात का? की रस्त्यावर टोलवसुलीचा हक्क मिळवायला आलात?
धाराशिव Live ची ठाम भूमिका!
- हा रस्ता अत्यंत गरजेचा आहे!
- वर्षानुवर्षे खड्डे, धूळ, चिखल सहन करणाऱ्या लोकांसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे.
- रस्त्यावर अपघात होऊन अनेकांचे बळी गेले, कोणी त्यांना न्याय मिळवून दिला का?
- आता काम सुरू होताच “गोंधळ” घालणारे हेच दलाल अपघातग्रस्तांच्या जखमांवर मीठ चोळत आहेत.
सरकारने काय करावे?
1️⃣ रस्त्याच्या कामात अडथळा आणणाऱ्या दलालांवर गुन्हे दाखल करावेत!
2️⃣ अशा बोगस आंदोलकांना तडीपार करावे!
3️⃣ शेतकऱ्यांच्या नावावर आंदोलन करणाऱ्या या दलालांची संपत्तीची चौकशी करावी!
📢 धाराशिव Live स्पष्टपणे सांगते – रस्ता हा सर्वसामान्यांचा हक्क आहे, दलालांचा धंदा नाही!
जनतेच्या हितासाठी हा रस्ता पूर्ण झालाच पाहिजे! 🚧🚦