• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, April 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नळदुर्गजवळ भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

admin by admin
September 4, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
नळदुर्गजवळ भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
0
SHARES
2.3k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग – मुंबई-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्गजवळील साई प्लाझा हॉटेलसमोर आज सकाळी एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या ट्रक आणि स्विफ्ट कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ७ वाजून २० मिनिटांच्या सुमारास हा अपघात घडला. हैदराबादकडून मुंबईच्या दिशेने जाणारा ट्रक (क्रमांक TS.13.UB.8676) आणि सोलापूरहून कर्नाटककडे जाणारी स्विफ्ट कार (क्रमांक KA.41.B.2600) यांची साई प्लाझा हॉटेलजवळ जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की स्विफ्ट कारचा समोरील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला.

या कारमधून एकूण पाच जण प्रवास करत होते. अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये मल्लोर रामच कल्ला (वय २७) आणि गिरिजाप्पा जगन्नाथ शरणम्मा (वय ४०) यांचा समावेश असून, दोघेही गुलबर्गा, कर्नाटक येथील रहिवासी आहेत.

अपघाताची माहिती मिळताच नळदुर्ग येथील जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थानच्या रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी जखमींना तातडीने नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, नळदुर्ग पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

निकृष्ट कामांवरून ठेकेदारांवर कारवाई करा, सर्व प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा…

Next Post

तुळजापूरमधील विकास कामांत मोठा भ्रष्टाचार, निकृष्ट कामांविरोधात महाविकास आघाडी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

Next Post
तुळजापूरमधील विकास कामांत मोठा भ्रष्टाचार, निकृष्ट कामांविरोधात महाविकास आघाडी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

तुळजापूरमधील विकास कामांत मोठा भ्रष्टाचार, निकृष्ट कामांविरोधात महाविकास आघाडी आक्रमक; आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

जळकोटमध्ये १ लाख १६ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; नळदुर्ग पोलिसांची धडक कारवाई

April 21, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; घरफोडी, वाहन चोरीसह पाच घटनांत लाखोंचा ऐवज लंपास

April 21, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

तेर येथील यात्रेत तरुणास बेदम मारहाण; १० जणांवर गुन्हा दाखल

April 21, 2026
देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

देवाच्या कार्यक्रमात जेवल्याचा राग; जात पंचायत बसवून महिलेला मारहाण आणि ६० हजारांची खंडणी

April 21, 2026
पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

April 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group