• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक: “तेव्हा लाठ्या-काठ्या खाल्ल्या आणि आता तिकीट नाकारले”

ओमराजे निंबाळकरांचे राणा पाटलांवर टीकास्त्र

admin by admin
January 28, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
१२ वाड्यांचा धनी ते दत्तक पाटील!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. रुईभर येथे पार पडलेल्या जाहीर सभेत शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजपचे आमदार राणा पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्ते रामदास कोळगे यांना उमेदवारी नाकारल्याच्या मुद्द्यावरून निंबाळकरांनी राणा पाटलांना लक्ष केले.

“निष्ठावंतांवर अन्याय का?”

रुईभर येथील सभेत बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आमदार राणा पाटील यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “जेव्हा राणा पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, तेव्हा रुईभरचे रामदास कोळगे भाजपचे काम नेटाने करत होते. त्या काळात कोळगे यांनी पक्षासाठी लाठ्या-काठ्या खाल्ल्या. मात्र, आज जेव्हा भाजपची सत्ता आहे आणि राणा पाटील पक्षात आले आहेत, तेव्हा याच निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलून बाहेरचा उमेदवार लादण्यात आला आहे.”

रामदास कोळगे कोण आहेत?

यावेळी निंबाळकरांनी रामदास कोळगे यांच्या ४० वर्षांच्या तपश्चर्येचा उल्लेख केला.

  • रामदास कोळगे हे गेल्या ४० वर्षांपासून भाजपमध्ये कार्यरत आहेत.

  • त्यांनी भाजपचे माजी सरचिटणीस आणि भाजयुमोचे माजी जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.

  • रुईभर परिसरात त्यांची शाळा असून अनेक संस्था त्यांच्या ताब्यात आहेत.

बंडखोरीची शक्यता ते माघार

बेंबळी गटातून रामदास कोळगे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारून आयता उमेदवार दिल्याने ते नाराज होते. कोळगे बंडखोरी करून निवडणूक लढवतील अशी दाट शक्यता निर्माण झाली होती, परंतु शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. याच धाग्याला पकडून ओमराजे निंबाळकर यांनी भर सभेत भाजपच्या अंतर्गत राजकारणावर आणि निष्ठावंतांच्या होणाऱ्या अवहेलनेवर बोट ठेवले.

Previous Post

अणदूर गणात मोठा ट्विस्ट! ‘वंचित’ची माघार, पण आता ‘मनसे’ने रोखला मार्ग;

Next Post

बाणगंगा साखर कारखान्यात वजन काट्यात ‘चिप’ लावून ६० ते ७० लाखांचा गंडा; आंतरराज्य टोळीवर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

बाणगंगा साखर कारखान्यात वजन काट्यात 'चिप' लावून ६० ते ७० लाखांचा गंडा; आंतरराज्य टोळीवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

कुस्तीपटू अश्विनी मोहितेंची तीन मुलांसह उडी; आईसह मुलगा आणि अडीच वर्षांच्या मुलीचा मृत्यू

कुस्तीपटू अश्विनी मोहितेंची तीन मुलांसह उडी; आईसह मुलगा आणि अडीच वर्षांच्या मुलीचा मृत्यू

September 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरीच्या घटना; रोख रकमेसह मोबाईल, दुचाकी व किराणा माल लंपास

September 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : देशपांडे स्टँडजवळ हातात कोयता घेऊन दहशत माजवणारे बहीण-भाऊ पोलिसांच्या जाळ्यात

September 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : शांतता राखण्याच्या बंधपत्राचा भंग करणाऱ्या सराईतावर दंडाधिकाऱ्यांची कडक कारवाई

September 3, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : ‘सोन्याचे बिस्कीट देतो, कानातले द्या’; वृद्ध महिलेला खोटे बिस्कीट देऊन ६५ हजारांचे सोन्याचे दागिने लांबवले

September 3, 2026

Recent Posts

  • कुस्तीपटू अश्विनी मोहितेंची तीन मुलांसह उडी; आईसह मुलगा आणि अडीच वर्षांच्या मुलीचा मृत्यू
  • धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरीच्या घटना; रोख रकमेसह मोबाईल, दुचाकी व किराणा माल लंपास
  • धाराशिव : देशपांडे स्टँडजवळ हातात कोयता घेऊन दहशत माजवणारे बहीण-भाऊ पोलिसांच्या जाळ्यात
  • धाराशिव : शांतता राखण्याच्या बंधपत्राचा भंग करणाऱ्या सराईतावर दंडाधिकाऱ्यांची कडक कारवाई
  • तुळजापूर : ‘सोन्याचे बिस्कीट देतो, कानातले द्या’; वृद्ध महिलेला खोटे बिस्कीट देऊन ६५ हजारांचे सोन्याचे दागिने लांबवले
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!