• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

पंतप्रधान मोदींची भेट घेत ओमराजे निंबाळकरांनी मांडल्या धाराशिवच्या विकासाच्या मागण्या

admin by admin
August 7, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
पंतप्रधान मोदींची भेट घेत ओमराजे निंबाळकरांनी मांडल्या धाराशिवच्या विकासाच्या मागण्या
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव | धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नवी दिल्ली येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामे आणि प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. शिवसेना खासदारांसाठी आयोजित करण्यात आलेल्या अल्पोपहार कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ही चर्चा झाली.

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे या भेटीची माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाचे सहकार्य मिळावे, यासाठी पंतप्रधानांसोबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी मतदारसंघातील विविध विकासकामांच्या मागण्यांचे निवेदनही त्यांनी पंतप्रधानांकडे सादर केले.

या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व शिवसेना खासदारांना आपल्या-आपल्या मतदारसंघातील विकासकामे गतीने पूर्ण करण्यासाठी सत्तेचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले. तसेच विकासकामांबाबत कोणतीही अडचण आल्यास थेट पंतप्रधान कार्यालयाशी (PMO) संपर्क साधण्याच्या सूचनाही दिल्या.

संवादादरम्यान पंतप्रधानांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नियमित योगाभ्यासाचीही आपुलकीने चौकशी केली आणि त्याबाबत माहिती जाणून घेतल्याचे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.

या भेटीनंतर केंद्र शासनाच्या सहकार्याने धाराशिवच्या विकासासाठी अधिक वेगाने आणि प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार अधिक दृढ झाल्याची भावना खासदार निंबाळकर यांनी व्यक्त केली.

उल्लेखनीय म्हणजे, २३ जून रोजी ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना (ठाकरे गट) सोडून उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने त्यांच्या दिल्ली दौऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी विविध मागण्यांचे निवेदन पंतप्रधानांकडे सादर केले आहे.

Previous Post

राणेंचा ४ तासांचा ‘लेटमार्क’, बांधावरचे ‘नाट्य’ आणि निष्ठावंतांच्या तोंडाला थेट पाने!

Next Post

घर फिरलं की वासे फिरतात! ओमराजेंची ‘दिल्लीवारी’ अन् राणा पाटलांची ‘दुहेरी कात्री’!

Next Post
पंतप्रधान मोदींची भेट घेत ओमराजे निंबाळकरांनी मांडल्या धाराशिवच्या विकासाच्या मागण्या

घर फिरलं की वासे फिरतात! ओमराजेंची 'दिल्लीवारी' अन् राणा पाटलांची 'दुहेरी कात्री'!

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

September 13, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर

September 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

हिंगळजवाडी : शेतातील गवत व झुडपे काढण्यावरून ७५ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाड अन् खोऱ्याने प्राणघातक हल्ला; ५ जणांवर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल

September 12, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

पश्चिम लोहटा : ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाच्या बाजूने हात वर केल्याने ग्रामस्थाला मारहाण; ८ जणांवर शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल

September 12, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

भूम : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला बालविवाह; पीडिता गर्भवती, पतीसह नातेवाइकांवर पोक्सो अन् बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

September 12, 2026

Recent Posts

  • आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद
  • बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर
  • हिंगळजवाडी : शेतातील गवत व झुडपे काढण्यावरून ७५ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाड अन् खोऱ्याने प्राणघातक हल्ला; ५ जणांवर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल
  • पश्चिम लोहटा : ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाच्या बाजूने हात वर केल्याने ग्रामस्थाला मारहाण; ८ जणांवर शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल
  • भूम : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला बालविवाह; पीडिता गर्भवती, पतीसह नातेवाइकांवर पोक्सो अन् बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!