• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, July 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

परंडा उपजिल्हा रुग्णालयात पत्रकाराला दमबाजी

डॉक्टरची 'खंडणी'चा आरोप आणि 'पायाने तुडवीन'ची धमकी – VIDEO व्हायरल

admin by admin
May 29, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
परंडा उपजिल्हा रुग्णालयात पत्रकाराला दमबाजी
0
SHARES
1.5k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा – आरोग्य सेवा ही देवाची सेवा मानली जाते, पण परंडा उपजिल्हा रुग्णालयात मात्र ही सेवा ‘दमदाटी’ आणि ‘शब्दांचा मार’ बनून राहिल्याचे थरारक चित्र समोर आले आहे. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या युट्यूब पत्रकाराला मारहाण आणि खोट्या आरोपांची धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?
रोसा येथील एका युट्यूब चॅनलचे बातमीदार समीर ओव्हाळ हे २९ मे रोजी आपल्या आजारी पत्नीला घेऊन परंडा उपजिल्हा रुग्णालयात गेले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी एक्स-रे करण्याचा सल्ला दिला. मात्र, वीज नसल्यामुळे एक्स-रे मशीन बंद होते. रुग्णालयात जनरेटर असतानाही ते सुरू न करण्यामागील कारण विचारले असता, तेथील कर्मचाऱ्यांनी उद्धटपणे उत्तर दिले.

ओव्हाळ यांनी या गोंधळाचा व्हिडीओ मोबाईलवर शूट करण्यास सुरुवात केली. त्यावेळीच ऑफिस सुप्रीटेंडेंट (OS) डॉ. विश्वेश कुलकर्णी घटनास्थळी आले आणि त्यांनी ओव्हाळ यांच्यावर व्हिडिओ काढल्याचा राग मनात धरून “खंडणी मागतोस” असा आरोप केला. इतक्यावरच न थांबता, “पायाने तुडवेन” अशी अत्यंत उद्दाम आणि धमकीजनक भाषा वापरण्यात आली.

व्हिडीओ व्हायरल, आरोग्य सेवांवर प्रश्नचिन्ह
संपूर्ण घटना ओव्हाळ यांनी रेकॉर्ड केली असून व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे परंडा उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी वृत्ती, प्रशासनाची कार्यपद्धती आणि रुग्णसेवेच्या गंभीरतेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.

प्रशासनाकडून चौकशी अपेक्षित
या घटनेमुळे वैद्यकीय अधिकार्‍यांच्या जबाबदारीची आणि पत्रकारांवरील गुन्हेगारी स्वरूपाच्या आरोपांच्या गंभीरतेची चर्चा रंगली आहे. संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी होत असून, आरोग्य विभागाने याची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी पत्रकार संघटनांकडून केली जात आहे.

Vidio

Previous Post

धाराशिव : जिल्हा परिषद अभियंत्यावर दुसऱ्या विवाहाचा आणि मारहाणीचा आरोप

Next Post

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: शुभम नेपतेस १४ दिवसांची पोलीस कोठडी; माजी नगराध्यक्षांसह पाच जणांचा जामीन अर्ज फेटाळला

Next Post
धाराशिव तालुक्यातील लाचखोर तलाठ्यास पाच वर्षांचा कारावास

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: शुभम नेपतेस १४ दिवसांची पोलीस कोठडी; माजी नगराध्यक्षांसह पाच जणांचा जामीन अर्ज फेटाळला

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर तालुक्यात सिंदगाव तलावावरील तब्बल ५,५५० फूट केबल वायर लंपास!

July 13, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर तालुक्यात कात्री गावामध्ये घरफोडी! ७५ हजारांचे दागिने लंपास करत चोरट्यांनी शेजाऱ्याची दुचाकीही पळवली

July 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

हैदराबाद-पुणे महामार्गावर थरार! कारमध्ये आराम करणाऱ्या बिदरच्या मित्रांना चाकू-टॉमीचा धाक दाखवून लुटले

July 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

नळदुर्ग हद्दीत धक्कादायक घटना! शेतात काम करणाऱ्या २४ वर्षीय विवाहितेला जिवे मारण्याची धमकी देत जंगलात नेऊन लैंगिक अत्याचार

July 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंड्यात मृताच्या नावावर जमीन हडपणारे मोठे रॅकेट उघड!

July 13, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group