• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: पिंटू गंगणेची न्यायालयीन कोठडीत रवानगी

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह कायम

admin by admin
June 12, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: माजी नगराध्यक्षा पतीला अंतरिम जामीन; पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
0
SHARES
1.3k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर शहरातील एमडी ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख आरोपी, विनोद उर्फ पिंटू गंगणे याच्या पोलीस कोठडीची सहा दिवसांची मुदत आज संपली. यानंतर त्याला धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश श्रीमती मिटकरी यांच्यासमोर हजर करण्यात आले असता, न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

आज झालेल्या सुनावणीदरम्यान अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. आरोपी गंगणे याच्या वकिलांनी त्याच्या प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत जामिनासाठी अर्ज दाखल केला. गंगणे याला किडनी, छाती आणि पोटदुखीचा त्रास होत असून, दोन दिवसांपूर्वी त्याला उपचारासाठी तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, असे न्यायालयात सांगण्यात आले.

याच वैद्यकीय कारणांचा दाखला देत पोलिसांनी आज गंगणेच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली नाही. मात्र, गरज भासल्यास पुन्हा पोलीस कोठडी मागण्याच्या अटीवर त्याला तात्पुरती न्यायालयीन कोठडी (MCR) देण्याची विनंती केली. पोलिसांच्या या भूमिकेमुळे आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याच्या आरोपाला पुन्हा एकदा बळ मिळाले आहे.

सरकारी वकील ॲड. जयंत देशमुख यांनी सरकारच्या वतीने जोरदार युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय जामीन अर्जावर निर्णय देता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

विशेष म्हणजे, याच पिंटू गंगणे याने या प्रकरणात ‘गोपनीय बातमीदार’ म्हणून पोलिसांना मदत केल्याचे फिर्यादी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, यांनी आपल्या जबाबात म्हटले होते, गंगणे याने व्यसनातून बाहेर पडून इतर तरुणांना वाचवण्यासाठी पोलिसांना मदत करत असल्याचेही सांगितले होते. मात्र, आता तोच या प्रकरणातील प्रमुख आरोपी बनल्याने आणि पोलीस त्याच्या कोठडीसाठी आग्रही नसल्याने संपूर्ण प्रकरणाच्या तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Previous Post

धाराशिव, तुळजापूर बसस्थानक निकृष्ट बांधकाम: कोट्यवधींचा चुराडा, प्रवाशांचे हाल; मंत्री सरनाईक यांचा चौकशीचा बडगा

Next Post

धाराशिवचा विकास की राजकीय कुरघोडीचा आखाडा? ‘शिव’ नावात, पण विकास ‘शवात’!

Next Post
धाराशिवचा विकास की राजकीय कुरघोडीचा आखाडा? ‘शिव’ नावात, पण विकास ‘शवात’!

धाराशिवचा विकास की राजकीय कुरघोडीचा आखाडा? ‘शिव’ नावात, पण विकास ‘शवात’!

ताज्या बातम्या

स्मार्ट मीटर व लोडशेडिंगविरोधात शिवसेनेचे महावितरण कार्यालयावर चक्काजाम आंदोलन

स्मार्ट मीटर व लोडशेडिंगविरोधात शिवसेनेचे महावितरण कार्यालयावर चक्काजाम आंदोलन

July 16, 2026
निसर्गाच्या सानिध्यात विठूनामाचा गजर… हरित वारीची नवी पाऊलवाट

निसर्गाच्या सानिध्यात विठूनामाचा गजर… हरित वारीची नवी पाऊलवाट

July 16, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

येडशी येथील दगडू देशमुख खून प्रकरणाचा २४ तासांत छडा!

July 15, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

येडशी जंगलाजवळ तरुण शेतकऱ्याचा गळा चिरून निर्घृण खून

July 15, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली धाराशिवच्या व्यक्तीला ११.४६ लाखांचा गंडा!

July 15, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group