• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, August 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

घाटनांदूर शिवारात विद्युत केबल तोडून ३ लाखांचे नुकसान; अज्ञात व्यक्तीवर वाशी पोलिसांत गुन्हा

admin by admin
January 23, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी: तालुक्यातील घाटनांदूर शिवारात विद्युत खांबावरील ‘स्काडा’ (SCADA) केबल तोडून कंपनीचे ३ लाखांहून अधिक नुकसान केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० जानेवारी रोजी सायंकाळी ६:३० ते २१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८:३० या दरम्यान घडली. घाटनांदूर शिवारातील गट नं. ६८०, ६५१ आणि ८४३ मधील ४ विद्युत खांबांवर बसवण्यात आलेली विद्युत मापक स्काडा केबल अज्ञात व्यक्तीने नुकसान करण्याच्या उद्देशाने तोडून टाकली. यामध्ये महावितरण कंपनीचे एकूण ३ लाख ६ हजार ५४९ रुपयांचे नुकसान झाले आहे.

याप्रकरणी अमोल आश्रुबा मोटे (वय ४१, रा. गिरवली, ता. भूम, जि. धाराशिव) यांनी गुरुवारी (दि. २२) वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२४ (५) अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत.

तामलवाडीतील इंडस टॉवरमधून एअरटेलचे फायबर चोरीला; ४० हजारांचे नुकसान

तामलवाडी: येथील इंडस टॉवर कंपनीच्या साईटवरून चोरट्यांनी ४० हजार रुपये किमतीचे एअरटेल कंपनीचे फायबर केबल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरीची घटना ७ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री १२:०० ते १:२० या वेळेत घडली. तामलवाडी येथील इंडस टॉवर कंपनीच्या आवारातून अज्ञात व्यक्तीने एअरटेलचे अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे फायबर चोरून नेले.

याप्रकरणी महादेव पंडित ढवण (वय ४२, रा. खंडाळा, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी गुरुवारी (दि. २२) पोलिसांत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून तामलवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

बेंबळी पोलिसांची धडक कारवाई: कत्तलीसाठी जाणारे ६ बैल वाचवले; लातूरच्या चालकावर गुन्हा दाखल

Next Post

अणदूर जिल्हा परिषद गटात दोन मावस भावांमध्येच राजकीय ‘कुस्ती’

Next Post
अणदूर जिल्हा परिषद गटात दोन मावस भावांमध्येच राजकीय ‘कुस्ती’

अणदूर जिल्हा परिषद गटात दोन मावस भावांमध्येच राजकीय 'कुस्ती'

ताज्या बातम्या

राणा पाटील आणि त्यांच्या ‘बगलबच्चांना’ मुंबई आणि दिल्लीतून एकाच दिवशी दोन मोठे हादरवणारे झटके!

‘माऊली’च्या स्टेटसला ऐतिहासिक ‘दे दणादण’ आणि हायकमांडचा राणांना ‘रायगड’चा धक्का!

August 5, 2026
बार्शी व शिराळा उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडा…

बार्शी व शिराळा उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडा…

August 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तेरखेडा येथे तुफान दंगल अन् दगडफेक! पोलिसांवरच प्राणघातक हल्ला

August 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब शहरात जमिनीच्या वादातून पुण्याच्या टोळक्यासह ९ जणांचा धुमाकूळ!

August 5, 2026
पोलिसांच्या शेतात डोलतंय ‘गांजाचं’ पीक! पण एफआयआर मात्र ‘अज्ञात’ आत्म्यावर!

पोलिसांच्या शेतात डोलतंय ‘गांजाचं’ पीक! पण एफआयआर मात्र ‘अज्ञात’ आत्म्यावर!

August 5, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!