देशात विकासाच्या नावाखाली कितीही गाजावाजा केला तरी, काही ठिकाणी हा विकास सामान्य जनतेसाठी नसून सत्ताधाऱ्यांच्या खिशात भर टाकण्यासाठीच असतो, हे वेळोवेळी स्पष्ट होत आहे. नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाचे धाराशिव जिल्ह्यातील प्रकरण हे त्याचे ताजे उदाहरण!
गावसूदच्या शेतकऱ्यांना फसवले की लुटले?
गावसूद गावातील शेतकऱ्यांनी शिक्षणाच्या विकासासाठी जमिनी दान केल्या होत्या. त्यावेळी त्यांना हे सांगण्यात आलं होतं की, हे कॉलेज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी असेल! शेतकऱ्यांनीही ही बाब मनावर घेत, केवळ एक हजार रुपये एकर दराने जमिनी दान केल्या.
पण सत्य समोर आल्यावर शेतकऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली! कारण त्या जमिनीतूनच आता ८६ हजार कोटींचा महामार्ग जात आहे, आणि त्या महामार्गामुळे शिक्षणाच्या नावावर उभारलेलं आमदाराचं कॉलेज व त्याच्या परिसराचा व्यावसायिक फायदा शेकडो कोटींमध्ये जाणार आहे! म्हणजे शिक्षणाच्या नावाखाली जमिनी घेतल्या आणि आता विकासाच्या नावाखाली त्याच जमिनींचा बाजार मांडला जातोय!
पक्ष बदलला, पण ‘सवय’ तीच!
हे सत्तेतील महाशक्ती असलेले आमदार पूर्वी दुसऱ्या पक्षात होते. पण जनतेचा नव्हे, स्वतःचा विकास करण्यासाठी त्यांनी पक्ष बदलला. सत्ता बदलली, पण प्रवृत्ती बदलली नाही! त्यांनी महामार्गाचा रस्ता आपल्या फायद्याच्या जागेतून वळवला. यासाठी त्यांनी जोर लावला, आग्रह धरला आणि आता स्वतःच्या फायद्याचा ‘टी पॉइंट’ तयार करून घेतला!
मुख्यमंत्री म्हणतात – आमदार लाभार्थी, मग विरोध कसा?
मुख्यमंत्री फडणवीस यांचे एक विधान या सगळ्या प्रकरणावर कमालीचे खोचक आहे. “आमदारांचा विरोध नाही, कारण ते स्वतःच लाभार्थी आहेत!” याचा सरळ अर्थ – जर तुमचा फायदा होत असेल, तर तुम्ही कधीच विरोध करणार नाही! मग लोकशाहीची, न्यायाची, समानतेची मूल्यं फक्त जनतेसाठीच आहेत का?
शेतकरी आता कोर्टात! पण न्याय मिळणार का?
आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर गावसूदचे शेतकरी आता कोर्टाचा दरवाजा ठोठावत आहेत. “आम्ही जमिनी दान केल्या, पण आता परत मिळवण्यासाठी लढणार!” असं त्यांचं ठाम म्हणणं आहे. पण हा लढा सत्तेच्या जोरावर दडपला जाणार की न्यायव्यवस्था न्याय देणार? हा मोठा प्रश्न आहे.
हा महामार्ग नागपूर-गोवा जोडणार, की भ्रष्टाचाराला ‘शॉर्टकट’ देणार?
हा महामार्ग सामान्य जनतेच्या फायद्यासाठी आहे की काही निवडक नेत्यांच्या बँक बॅलन्ससाठी? ही बाब आता जनतेनं ओळखली पाहिजे. लोकांनी शांत बसण्यापेक्षा प्रश्न विचारले पाहिजेत. कारण आज जर हा ‘महामार्ग वळवण्याचा’ खेळ गप्प बसून पाहिला, तर उद्या आपल्या जमिनी, हक्क, आणि स्वातंत्र्यदेखील वळवलं जाईल!
🔴 हा विकास आहे, की लूट?
🔴 हा महामार्ग आहे, की भ्रष्टाचाराचा ‘शॉर्टकट’?
🔴 हे सरकार आहे, की दलालांचा सिंडिकेट?
🔴 हा शक्तीपीठ महामार्ग श्री तुळजाभवानी तीर्थक्षेत्र जोडण्यासाठी आहे की , आमदाराचे विद्यापीठ जोडण्यासाठी आहे ?
जनतेनं याचा विचार करून आवाज उठवला पाहिजे. नाहीतर “हायवेवरून गाड्या धावतील, पण लोकशाहीचा शववाहन बनवला जाईल!” 🚨