अणदूर : मुंबई-हैदराबाद महामार्गावरील नॅशनल धाब्याजवळ आज एका अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात महावितरण कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर-उमरगाकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने देशमुख वस्तीकडून येणाऱ्या MH 25 V 8716 क्रमांकाच्या मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात मोटरसायकलस्वार पांडुरंग भारत बोरजे (वय ३५, रा. अणदुर, ता. तुळजापूर) हे जखमी झाले.अपघातानंतर नळदुर्ग पॉईंट येथील जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धामच्या मोफत रुग्णवाहिकेने तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना नळदुर्ग उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
परंतु प्रकृती गंभीर झाल्याने सोलापूरला हलवण्यात आले, पण वाटेतच मृत्यू झाला. बोरजे हे महावितरणमध्ये वायरमन होते.पोलिसांनी अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे.