तुळजापूर – शहरातील एका ९ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दि. १६ सप्टेंबर रोजी ही मुलगी कुरकुरे आणण्यासाठी किराणा दुकानात गेली असता, जवळच राहणाऱ्या एका प्रौढ इसमाने तिला घरात बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. भीतीपोटी मुलीने या घटनेबाबत कुणाला काही सांगितले नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीवर भा.न्या.सं. कलम- 64(2)(i), 65(2), 75(1), 351(2) सह कलम 4, 8,10,12 बा.लै.अ.अधि 2012 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
- कुरकुरे आणण्यासाठी गेलेल्या मुलीला आरोपीने घरात बोलावले
- जीवे मारण्याची धमकी देऊन लैंगिक अत्याचार
- आईच्या तक्रारीवरून पोलिसांकडून गुन्हा दाखल
- आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी
या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून आरोपीला अटक कऱण्यात आली आहे.