वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गावात राहणाऱ्या 25 वर्षीय महिलेवर तिच्याच गावातील एका तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडितेला 14 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 7 वाजल्यापासून 16 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत पीडितेला गावातील एका पडक्या घरात बंदिस्त करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले.
याप्रकरणी पोलिसांनी 17 सप्टेंबर 2024 रोजी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी तरुणाविरुद्ध भा.न्या.सं. कलम- 64(2)(I)(J)(K),137(2), 127(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिलेचे नाव आणि गाव गोपनीय ठेवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने पीडितेला गावातील एका पडक्या घरात नेले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तिला त्याच घरात बंद करून ठेवले. पीडितेने घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि आरोपीला अटक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.