तामलवाडी – श्रीवर्धन शुगर ॲग्रो प्रा. लि. काटी येथे स्टोअर किपर व वायरमन म्हणून काम करणाऱ्या दोघांनी कंपनीमधील ४२ हजारांहून अधिक किमतीचा माल चोरून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना २८ जानेवारी रोजी उघडकीस आली. याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हरीदास राम देवणे (रा. बोरुळ, ता. देवणी, जि. लातुर) आणि विष्णु बालाजीराव शिंगनाळा (रा. महेकर, ता. भालकी, जि. बीदर) हे श्रीवर्धन शुगर ॲग्रो कंपनीत अनुक्रमे स्टोअर किपर व वायरमन म्हणून कार्यरत होते. २८ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांनी मिरीडा कंपनीचे टॉवर शंक टिवस्ट ड्रिल ३२ एमएम, ३० एमएम, २० एमएम, १६ एमएम आणि तीन बेअरिंग असा एकूण ४२,४४२ रुपये किमतीचा माल बॅगेत भरून चोरून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, कंपनीतील कर्मचाऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी कंपनीचे कर्मचारी कैसरपाशा खाजानुर सय्यद (वय ३१, रा. काटी, ता. तुळजापूर) यांनी तामलवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३७९, ६२, ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.