कळंब: कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत जि.प. मुलींच्या शाळेजवळ 27 जानेवारी रोजी सायंकाळी 17.48 वाजता सार्वजनिक ठिकाणी हाणामारी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी तब्बल 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालाबाई सरदार शिंदे, अनिता संजय काळे, आशाबाई संजय काळे, संजय वसंत काळे, बालीबाई भिमा पवार, सुनिल भिमा पवार, सिमींताबाई बिरु काळे, शिवाजी प्रकाश काळे, दिनेश नागनाथ काळे, छकुली चेल्या पवार, अनिता धनाजी शिंदे, दिदि सुनिल पवार, काका सायबा शिंदे, बालाजी सायबा शिंदे, नवनाथ बिचव्या शिंदे, बिभिषन उत्तम शिंदे, रवि आबा शिंदे आबा आप्पा शिंदे, अनिताआबा शिंदे, शिवराम लाला शिंदे, लालु बबन शिंदे, भैय्या बबन शिंदे, भाउ नवनाथ शिंदे बबन बापू शिंदे, शांताबाई बबन शिंदे, विलास सायबा शिंदे, सुगंधाबाई सायबा शिंदे, भामाबाई सायबा शिंदे, आशाबाई बालाजी शिंदे, बिचवा बालाजी शिंदे सागर बालाजी शिंदे, दादा बालाजी शिंदे, बबलु बिभिषन शिंदे, बाळु रवि काळे, राहुल नवनाथ शिंदे आणि पोपट कल्याण शिंदे यांनी मोहा पारधी पिडी जवळील जि.प. मुलींचे शाळेच्या जवळ सार्वजनिक ठिकाणी आपापसात हाणामारी करून सार्वजनिक शांतता भंग केली.
या घटनेची माहिती मिळताच कळंब पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि सर्व आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरून सर्व आरोपींविरुद्ध भादंवि संहिता कलम 194(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू आहे.