उमरगा – उमरगा तालुक्यातील कराळी येथे दोन तरुणांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना घडली आहे. आरोपींनी तलवार आणि हंटरचा वापर करून तरुणांना धमकावल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे मंदिरातील तरुणांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
दि. २७ जानेवारी २०२५ रोजी रात्री ९ वाजता आगजाप्पा देवस्थान कराळी येथे ही घटना घडली. अमोल भरत जमादार आणि नागराज बापु जमादार (दोघे रा. कराळी) यांनी अदित्य मंगेश वैष्णव आणि गौरव लक्ष्मण कदम यांना तलवार आणि हंटर दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी अदित्य वैष्णव यांच्या छातीवर बसून त्यांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच लाउडस्पीकरवरून गावकऱ्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. मठाधीपती तेजसनाथ महाराज यांनाही फोनवरून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेमुळे मंदिरातील तरुणांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. शोभा काशिनाथ वडदरे (वय ४५ वर्षे, रा. कराळी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम १०९, ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) सह ४/२४ शास्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.