• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, May 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तामलवाडीतील MIDC प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; मोबदला नाकारत जमिनी देण्यास ठाम नकार

admin by admin
June 7, 2025
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
तामलवाडीतील MIDC प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; मोबदला नाकारत जमिनी देण्यास ठाम नकार
0
SHARES
250
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

 तुळजापूर – तालुक्यातील तामलवाडी येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) नियोजित प्रकल्पासाठी होणाऱ्या भूसंपादनाला स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या एका अर्जात, शेतकऱ्यांनी आपली जमीन वडिलोपार्जित असल्याचे सांगत ती कोणत्याही परिस्थितीत संपादित करू देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. 

शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, तामलवाडी येथील नियोजित MIDC साठी जमीन संपादित करण्याकरिता त्यांना शासकीय व निमशासकीय बैठकांसाठी वारंवार बोलावले जात आहे. यापूर्वी २० ऑगस्ट २०२४, २३ जानेवारी २०२५ आणि २२ मे २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी, धाराशिव यांना याबद्दल लेखी आणि तोंडी कळवूनही या बैठका सुरूच असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, ते कोणत्याही प्रकारच्या सरकारी मोबदल्याचा विचार करत नाहीत. निवेदनात म्हटले आहे की, “आमच्या जमिनी वडिलोपार्जित व आम्ही सर्व भूमिहीन होणार असल्यामुळे आम्हाला मोबदल्याची कोणतीही अपेक्षा नाही.” या कारणामुळे, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपल्या जमिनी औद्योगिक महामंडळासाठी देणार नसल्याचे ठामपणे सांगितले आहे. 

या प्रक्रियेला शेतकऱ्यांची संमती नसल्यामुळे, यापुढे कोणत्याही बैठकीसाठी बोलावण्यात येऊ नये, अशी विनंती त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.  या एकत्रित विरोधामुळे तामलवाडीतील MIDC भूसंपादनाचा मार्ग खडतर होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांचं जमिनी उद्योगपतीच्या घश्यात घालण्याचा एका राजकीय नेत्याचा डाव असून, या उद्योगपतीबरोबर त्यांची पार्टनरशिप असल्याची चर्चा सुरु आहे.

 

Previous Post

‘सायलेंट झोन’ आणि ‘वन कलर व्हिलेज’: जकेकूरवाडी ठरतंय बदलाचं नवं मॉडेल!

Next Post

तामलवाडी MIDC – विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक?

Next Post
तामलवाडीतील MIDC प्रकल्पाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; मोबदला नाकारत जमिनी देण्यास ठाम नकार

तामलवाडी MIDC - विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक?

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

रांजणीत सालगड्यानेच केला विश्वासघात; मालकाचे सव्वाचार लाख रुपये घेऊन पोबारा

May 25, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

मळगीवाडीत शेतातील माती टाकण्याच्या वादातून वृद्धेला बेदम मारहाण

May 25, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

‘हॉर्न का वाजवला?’ म्हणत दाम्पत्याला लुटले; उमरगा चौरस्त्यावरील धक्कादायक घटना

May 25, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापुरात किरकोळ वादातून दोघांवर चाकू हल्ला; बोंबले चौकातील घटनेने खळबळ, एकावर गुन्हा दाखल

May 24, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरग्यात ‘वंचित’च्या कार्यालयात घुसून पदाधिकाऱ्यावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला; शहरात खळबळ

May 24, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group