• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, March 19, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तामलवाडी पोलिसांची मोठी कारवाई: म्हशी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; सावरगावच्या दोघांसह तिघांना अटक

admin by admin
February 1, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
0
SHARES
183
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तामलवाडी: तामलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिसेंबर २०२५ मध्ये घडलेल्या जनावरांच्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सावरगाव येथील दोन सराईत चोरट्यांसह लातूरमधील एका खरेदीदारास अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या दोन म्हशी आणि वाहतुकीसाठी वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे.

डिसेंबर महिन्यात नांदुरी गावातून तीन म्हशी चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर आणि त्यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली. त्याआधारे त्यांनी अजीम निजाम सय्यद आणि निलेश नागनाथ तानवडे (दोघे रा. सावरगाव, ता. तुळजापूर) यांना ताब्यात घेतले.

पोलिसी खाक्या दाखवताच दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी नांदुरी येथून तीन म्हशी चोरल्याचे कबूल केले. त्यापैकी एक म्हैस त्यांनी लातूर येथील सोहेल साजिद कुरेशी याला विकली होती. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सोहेल कुरेशी यालाही ताब्यात घेतले आणि म्हैस विक्रीतून मिळालेली रक्कम जप्त केली.

तसेच मुख्य आरोपी अजीम सय्यद याच्याकडून दोन म्हशी आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. या गुन्ह्यात एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी अजीम सय्यद याच्याकडून जनावरे चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफाकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गोकुळ ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप टेकाळे, पोलीस हवालदार तोगे, काझी, पोलीस अंमलदार सुरज नरवडे, गोपाळ सलगर, गायकवाड, शेख आणि नितीन भोसले यांनी केली.


Previous Post

गर्दीचा फायदा घेत एसटी प्रवासात महिलेचे दागिने लंपास; संभाजीनगर ते कळंब दरम्यानची घटना

Next Post

धाराशिवमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांना लोखंडी रॉडने मारहाण

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिवमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यांना लोखंडी रॉडने मारहाण

ताज्या बातम्या

धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी

धाराशिव: आर्थिक तडजोड करून गाडी सोडल्याचा आरोप; पोलीस कर्मचाऱ्याचे वर्तन संशयास्पद असल्याचा अहवाल, मात्र अद्याप कारवाई नाही!

March 18, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची निर्दयी वाहतूक; धाराशिव पोलिसांची कारवाई, सव्वाचार लाखांचा मुद्देमाल जप्त

March 18, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

भूममध्ये बंद घर फोडले; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ९८ हजारांचा मुद्देमाल लंपास

March 18, 2026
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

उमाचीवाडीत ६० वर्षीय वृद्धाला बेदम मारहाण; सहा जणांवर गुन्हा दाखल

March 18, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

शासकीय कामात अडथळा; पवनचक्कीच्या कामगारांना मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल

March 18, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group