• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: फरार आरोपीचा भाऊ पोलीस अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये?

 व्हीआयपी ट्रीटमेंटचा आरोप

admin by admin
May 5, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: फरार आरोपीचा भाऊ पोलीस अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये?
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तामलवाडी – तुळजापूर येथील गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणात तामलवाडी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. या प्रकरणातील एका फरार आरोपीचा भाऊ चक्क सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या केबिनमध्ये गप्पा मारताना आढळल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट देत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात एकूण ३६ आरोपी असून, त्यापैकी १५ जणांना अटक करण्यात आली आहे. यातील १४ जण सध्या न्यायालयीन कोठडीत असून, रणजित पाटील नावाचा आरोपी नुकताच अटकेत आहे. या प्रकरणातील एक आरोपी विनोद गंगणे हा अजूनही फरार आहे.

आज (दि. ५ मे) सायंकाळी सुमारे ५:३७ वाजता, फरार आरोपी विनोद गंगणे याचा भाऊ विजय गंगणे हा तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या केबिनमध्ये बसून त्यांच्याशी गप्पा मारत होता. ही बाब सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ माने यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तात्काळ सपोनि ठाकूर यांना फोन करून याबाबत विचारणा केली.

राजाभाऊ माने यांनी आरोप केला आहे की,  सध्या अटकेत असलेल्या रणजित पाटील हा विजय गंगणे यांचा कार्यकर्ता आहे. जर रणजित पाटील यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड (सीडीआर) तपासले, तर विजय गंगणे हा देखील या प्रकरणात आरोपी होऊ शकतो. पोलीस ठाण्यात एका फरार आरोपीच्या भावाला अशा प्रकारे सहज प्रवेश मिळणे आणि अधिकाऱ्यासोबत गप्पा मारताना दिसणे, हे पोलीस आरोपींना किंवा त्यांच्या संबंधित लोकांना व्हीआयपी ट्रीटमेंट देत असल्याचे दर्शवते, असा दावा माने यांनी केला आहे.

विजय गंगणे हा नेहमीच तामलवाडी पोलीस स्टेशनमध्ये असतो, त्यांचे नेमके काय काम असते ? पोलिसांशी डील करायला येतो का ? असा सवालही माने यांनी विचारला आहे.

माने यांनी पोलीस स्टेशनमधील आजच्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची आणि या प्रकरणात सपोनि गोकुळ ठाकूर यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाच्या तपासावर आणि पोलिसांच्या निःपक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Previous Post

परंडा तालुक्यातील कंडारीत दिवसाढवळ्या घरफोडी; अडीच लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास

Next Post

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण भाग ५: गंगणेंकडून एकाच दिवशी सव्वा लाखाची ड्रग्ज खरेदी!

Next Post
धाराशिव जिल्ह्यात ड्रग्जचा कहर – प्रशासनाची जबाबदारी कुठे?

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण भाग ५: गंगणेंकडून एकाच दिवशी सव्वा लाखाची ड्रग्ज खरेदी!

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

September 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली

September 16, 2026

Recent Posts

  • दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास
  • जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल
  • धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद
  • तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!