तुळजापुरात फोफावलेल्या ड्रग्ज विरोधात आता पुजारी मंडळ आणि जागरूक नागरिक एकवटले आहेत. यावर कडक कारवाईसाठी उद्या, २१ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
डीवायएसपी देशमुखांच्या बदलीची मागणी – नागरिक आक्रमक!
या प्रकरणात पोलिसांकडून होत असलेल्या हलगर्जीपणाला नागरिक संतप्त झाले आहेत. विशेषतः डीवायएसपी निलेश देशमुख यांनी काही नागरिकांना धमकी दिल्याचा आरोप असून, त्यांच्या तातडीने बदलीची मागणी जोर धरू लागली आहे.
आमदारांचा संशयास्पद मौन – सोशल मीडियावर ऍक्टिव्ह, पण मैदानात गप्प?
तुळजापूर मतदारसंघाचे नेतृत्व करणारे आमदार या संपूर्ण प्रकरणावर चुप्पी साधून आहेत.
- माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली तरी उत्तर नाही.
- सोशल मीडियावर सक्रिय असणारे आमदार प्रत्यक्षात गप्प बसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
- ड्रग्ज विकणाऱ्या पेडलरला कुणाचे संरक्षण आहे? असा सवाल नागरिक विचारत आहेत.
ड्रग्ज विकणारे पेडलर ‘त्या’ राजकीय नेत्याचे कार्यकर्ते?
नागरिकांमध्ये चर्चा आहे की तुळजापुरात ड्रग्ज विकणारे काही पेडलर एका मोठ्या राजकीय नेत्याचे कार्यकर्ते आहेत. यामुळेच पोलिसांना मुळापर्यंत हात घालायला भीती वाटतेय का? हा खरा प्रश्न आहे.
पोलिसांची पुढची चाल काय?
नागरिकांनी आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून लढा द्यायचे ठरवले आहे. उद्याच्या उपोषणानंतर प्रशासन या प्रकरणात कठोर कारवाई करते की दबावाखाली राहते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
➡ तुळजापूरकर आता गप्प बसणार नाहीत, पोलिसांनी आणि नेत्यांनीही सावध राहावे!