तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणाने जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे. या प्रकरणातील आरोपींवरुन राजकारण्यांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. धाराशिवमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत तुळजापूरचे माजी नगरसेवक राहुल खपले यांनी थेट आरोप करत भाजपचे काही कार्यकर्ते या ड्रग्ज रॅकेटमध्ये गुंतल्याचा दावा केला आहे.
या ड्रग्ज तस्करी प्रकरणामुळे तुळजापूर शहराची प्रतिमा मलीन झाली आहे. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये रोष असून, तालुक्यातील १० ते १२ गावांनी तुळजापूर शहरातील तरुणांशी विवाहसंबंध जोडण्यास नकार दिला आहे.
गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, “तुळजापूरमध्ये मुलींना देण्यास आता घाबरायला लागले आहे. ड्रग्ज तस्करी आणि गुन्हेगारीशी संबंधित कुटुंबांशी नाते जोडणे अपमानास्पद ठरेल.”
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणाने केवळ कायदा आणि सुव्यवस्था ढवळून निघाली नाही, तर या प्रकरणामुळे तुळजापूरच्या तरुणांची लग्न जुळवण्याची संधीच धोक्यात आली आहे. शहराची प्रतिष्ठा मलीन झाल्यामुळे, आता तुळजापूरच्या तरुणांना पोरी मिळणार नाहीत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
गावागावांतून मुली देण्यास नकार!
या प्रकरणानंतर तुळजापूर शहराच्या प्रतिमेवर इतका कलंक लागला आहे की, तालुक्यातील किमान १० ते १२ गावांनी तुळजापूरमध्ये मुली देण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. राहुल खपलेच्या मते, “तुळजापूरमधील तरुणांचे ड्रग्ज आणि गुन्हेगारीशी संबंध असण्याची भीती आहे. त्यामुळे आपल्या मुलींचे आयुष्य धोक्यात घालणार नाही.”
“आम्ही आता तुळजापूरच्या मुलांशी मुलींचे लग्न लावणार नाही. ड्रग्ज आणि गुन्हेगारीशी संबंध असलेल्या लोकांशी नाते जोडणे हे अपमानास्पद ठरेल. आम्ही आमच्या मुलींच्या भवितव्याची काळजी घेतो.”
तुळजापूरच्या तरुणांमध्येही या परिस्थितीमुळे तीव्र नाराजी आहे. “ड्रग्ज माफियांच्या पापाचा खमियाजा आम्हाला का भोगावा लागतो?” असा प्रश्न अनेक तरुण उपस्थित करत आहेत. अनेक तरुणांनी सांगितले की, “आम्ही सामान्य कुटुंबातील आहोत, गुन्हेगारीशी आमचा काहीही संबंध नाही. पण काही लोकांमुळे संपूर्ण शहराची प्रतिमा मलीन झाली आहे.”
राजकीय हस्तक्षेप आणि पोलिसांची भूमिका:
या प्रकरणात काही आरोपी भाजपचे कार्यकर्ते असून, स्थानिक आमदारांचे कट्टर समर्थक असल्याचा आरोप माजी नगरसेवक राहुल खपले यांनी केला आहे. त्यांनी विचारले की, “या आरोपींवर कोणाचा वरदहस्त आहे? स्थानिक आमदारांनी या प्रकरणात खुलासा करावा.”
भाजप कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप:
राहुल खपले यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे म्हटले की, या ड्रग्ज प्रकरणातील काही आरोपी भाजपचे कार्यकर्ते असून, ते स्थानिक आमदारांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांनी पुढील आरोपींची नावे घेतली:
१. विनोद उर्फ पिटू गंगणे – माजी नगराध्यक्ष पती
२. चंद्रकांत उर्फ बापू कणे – माजी नगराध्यक्ष, तुळजापूर
३. शरद रामकृष्ण जमदाडे – माजी सभापती
४. विश्वनाथ तर्फ पिंटू आप्पाराव मुळे – भाजप कार्यकर्ता
राहुल खपले यांनी विचारले की, “या आरोपींवर कोणाचा वरदहस्त आहे? स्थानिक आमदारांनी या प्रकरणात आपली भूमिका स्पष्ट करावी.”
Video