तुळजापूर :आरोपी नामे- 1)महेश लोंढे,2) गोरख पारधे दोघे रा. मांतग नगर तुळजापूर, 3) प्रमोद खंडागळे रा. जिजामाता नगर तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.16.12.2023 रोजी 18.15 वा .सु. हंगरगेकर शाळे जवळ हाडको तुळजापूर येथे फिर्यादी नामे-स्वप्नील शिरीष मोरे, वय 26 वर्षे, रा. शिवाजी नगर हडको तुळजापूर जि. धाराशिव, यांना नमुद आरोपींनी आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन नमुद आरोपीने जिवे मारण्याचे उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, उपरण्याने गळा आवळण्याचा प्रयत्न करुन लोखंडी रॉड, लोखंडी कत्ती व काठीने डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- स्वप्नील मोरे यांनी दि.24.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 307, 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब :आरोपी नामे-1)रोहीत हनुमंत तांबारे,2)रोहन हनुमंत तांबारे, दोघे रा. अंदोरा ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.23.12.2023 रोजी 20.30 वा. सु. अंदोरा येथे फिर्यादी नामे- सचिन अरुण तांबारे, वय 36 वर्षे, रा. अंदोरा, ता. कळंब जि. धाराशिव यांना तु आमच्या आईस मोटरसायकलवर बसवून कळंब येथे घेवून का गेलास या कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीची पत्नी व वडील हे भांडण सोडवण्यास आले असता नमुद आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- सचिन तांबारे यांनी दि.24.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कंळब पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
फसवणूक
शिराढोण :आरोपी नामे- 1)ओंकार चंद्रशेकर पवार, रा. पाटोदा, ता. जि. धाराशिव यांनी दि. 30.11.2023 रोजी 16.00 वा. पुर्वी दिलीप दादा नाडे फार्मर ॲग्रीकलचेर प्राव्हेट लिमीटेड या कारखान्याला उस पुरवितो असा करार करुन 15,00,000₹ एडव्हांस घेवून कारखान्याला उस न पुरविता त्याचे मालकीचे हार्वेस्टर मशीन व इनफिल्डर सह कारखान्याची फसवणुक करुन पळून गेला. अशा मजकुराच्या फिर्यादी- राजेश विजयकुमार तवले, वय 42 वर्षे, व्यवसाय- दिलीप दादा नाडे फार्मरॲग्रीकल्चर प्राव्हेट लिमीटेड रा. भंडारवाडी, ता. जि. धाराशिव यांनी दि.24.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे कलम 419, 420 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.