तुळजापूर आणि धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये शस्त्र बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तुळजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रेम लाला पवार (वय १९, रा. तुळजापूर) याला २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता कमान वेस कडून तुळजाभवानी मंदीराकडे जाणाऱ्या रस्त्यावर लोखंडी कोयता घेऊन जाताना आढळून आला. जिल्हाधिकारी धाराशिव यांनी जारी केलेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७(१)(३) अन्वये शस्त्र बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पवारला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध भादंवि कलम २२३ सह शस्त्र कायदा कलम ४, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत, धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिद्धेश्वर राजेंद्र कदम (वय २४, रा. वडगाव) याला २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता बावी पाटीजवळ हॉटेल रानवारा जवळ पितळी तलवार घेऊन जाताना आढळून आला. त्याच्याविरुद्धही शस्त्र बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शस्त्र कायदा कलम ४, २५ सह ३७(१)(३), १३५ मपोका अन्वये ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी शस्त्रे जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.