वाशी – वाशी तालुक्यातील पारा गावातून दोन दुभत्या गाईंची चोरी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
संतोष श्रीरंग चौधरी (वय ३०, रा. पारा) यांच्या पारा शिवारातील गोठ्यातून २७ जानेवारी रोजी रात्री दोन दुभत्या गाई चोरीला गेल्याची तक्रार वाशी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. चोरीस गेलेल्या गाईंची किंमत १,०५,००० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रविण रमेश चौधरी (वय २१, रा. पारा) याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.