आंबी: कार्ला येथील कालिका देवी मंदिरातून १८,५०० रुपये किमतीचे साहित्य चोरीला गेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
संतोष नवनाथ भुजे (वय ४५, रा. कार्ला) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ ते १२ या वेळेत मंदिरातील चार चांदीचे घोडे, तीन पितळी घंटा, एक पितळी मंदीराचा कळस, एक जर्मनचा गणपती आणि एक जर्मनची विठ्ठल-रुक्मिणी असे १८,५०० रुपये किमतीचे साहित्य चोरीला गेले होते.
याप्रकरणी आंबी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. तपासादरम्यान, गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपी सुनिल मोहन पवार (रा. हळगांव, ता. जामखेड, जि. अहमदनगर) याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.