धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पहिला अपघात बेंबळी येथे झाला, तर दुसरा उमरगा येथे घडला.
पहिला अपघात बेंबळी गावाजवळ, दिनांक १९ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता घडला. मयत प्रविण नवनाथ तानले (वय २२ वर्षे) हे त्यांच्या मोटरसायकलवरून पशुद्दीन शेरीकर यांच्या शेताजवळून जात असताना हा अपघात घडला. आरोपी राम उर्फ गुरुलिंग उर्फ गुराप्पा (रा. कानेगाव ता. लोहारा) यांनी आपल्या ताब्यातील आयशार टेम्पो (क्र. एमएच ०७ एजी ०३७७) निष्काळजीपणे चालवून तानले यांच्या मोटरसायकलला समोरून धडक दिली. या अपघातात प्रविण तानले गंभीर जखमी झाले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. तानले यांच्या वडिलांनी बेंबळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६(१) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दुसरा अपघात उमरगा येथे दिनांक १४ जुलै २०२४ रोजी रात्री ८:३० ते ९:०० वाजण्याच्या दरम्यान घडला. मयत सतिश विलास सुभेदार (वय २४ वर्षे) हे त्यांच्या मोटरसायकलवरून (क्र. एमएच २५ एपी ७८९५) जात असताना हा अपघात झाला. आरोपी कारचालकाने (क्र. एमएच १२ ईएक्स ७९६६) आपल्या ताब्यातील कार निष्काळजीपणे चालवून सुभेदार यांच्या मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या अपघातात सतिश सुभेदार गंभीर जखमी झाले व त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुभेदार यांच्या वडिलांनी उमरगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(बी), १०६(१) सह १८४ मोटार वाहन कायदा अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील या दोन अपघातांमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासनाने या प्रकरणांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.