उमरगा : मयत नामे- निरंजन उमेश माळी, वय 30 वर्षे, रा. रामपुर ता. उमरगा जि. धाराशिव व सोबत आसिफ अब्दुल शेख, वय 19 वर्षे, रा. येळी ता. उमरगा जि. धाराशिव हे दोघे दि.11.05.2024 रोजी 01.00 वा. सु. एनएच 65 रोडवरुन ट्रॅक्टर ट्रॉलीत जात होते. दरम्यान रामपुर पाटी येथे ट्रक क्र एमएच 12 टिव्ही 2295 चा चालक आरोपी नामे- मोहीद आदम मुजावर रा. साईनगर अक्कलकोट रोड सोलापूर जि. सोलापूर यांनी त्यांचे ताब्यातील ट्रक ही हायगई व निष्काळजीपणे रॉग साईडने चालवून निरंजन माळी यांचे ट्रॅक्टरला समोरुन धडक दिली. या अपघातात निरंजन माळी, आसिफ शेख हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अब्दुल रशीद शेख, वय 51 वर्षे रा. येळी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.18.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.वि.सं. कलम- 279, 338, 304(अ), सह 184 मोवका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : मयत नामे-यश ज्ञानेश्वर पाटील, वय 19 वर्षे, रा.उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि. 09.05.2024 रोजी 23.30 ते 24.00 वा. सु. शिवपुरी रोड उमरगा येथे शासकिय शौचालय समोरुन स्कुटीवरुन जात होते. दरम्यान कार क्र एमएच 12 जीव्ही 1176 चा चालक आरोपी नामे- संतोष माळी रा. उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी त्यांचे ताब्यातील कार ही हायगई व निष्काळजीपणे चालवून यश पाटील यांचे स्कुटीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात यश पाटील हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- कैलास भानुदास आष्टे, वय 55 वर्षे, रा. अजय नगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.18.05.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.दं.वि.सं. कलम- 279, 304(अ), सह 134 (अ) (ब), 184 मोवका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : मयत नामे-बाबन गफुर पटेल, वय 49 वर्षे, व सोबत फिर्यादी नामे- शाहीनबी बाबन पटेल वय 18 वर्षे, रा. येळी ता. उमरगा जि. धाराशिव हे दोघे दि.11.05.2024 रोजी 13.30 वा. सु. नारंगवाडी शिवारातील जयप्रकाश माने यांचे शेताजवळ एनएच 548 रोडवरुन मोटरसायकल क्र एमएच 25 एटी 0848 वर बसून निलंगा येथुन गावाकडे येत होते. दरम्यान ट्रॅक्टर क्र एमएच 25 एएल 5376 चा चालक नामे- संदीप राजेश सोनवणे रा. महादेव गल्ली उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी त्यांचे ताब्यातील ट्रॅक्टर हे हायगई व निष्काळजीपणे रॉग साईडने चालवून बाबन पटेल यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात बाबन पटेल हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर शाहीनबी पटेल या गंभीर जखमी झाल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शाहीन बी पटेल यांनी दि.17.05.2024 रोजी दिलेल्या वैद्यकिय जबाबावरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ), सह 184 मोवका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.