वाशी – येथे पार्किंगच्या कारणावरून झालेल्या वादात एका तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल रावसाहेब क्षिरसागर आणि पोपट रावसाहेब क्षिरसागर या दोघा आरोपींनी 5 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास साठेनगर वाशी येथे हरी विठ्ठल क्षिरसागर (वय 24) यांना गाडी पार्किंग करण्याच्या कारणावरून शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनी हरी यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून कानावर मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
या घटनेनंतर हरी क्षिरसागर यांनी 8 ऑगस्ट 2024 रोजी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे राहुल आणि पोपट क्षिरसागर यांच्याविरुद्ध भादंवि कलम 117, 352, 351(2), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.