वाशी : फिर्यादी नामे-भास्कर बाबासाहेब मिसाळ, वय 61 वर्षे, रा. पर्णकुटी गृहनिर्माण सोसायटी व्यंकटेश पब्लीक स्कुल जवळ भक्ती कंन्टरकशन बीड ता.जि. बीड हे कुंटुबासह दि. 30.06.2024 रोजी 22.00 ते 22.30 वा. सु. पारगाव शिवारातील एन.एच 52 रोडवरुन चार चाकी गाडीतुन जात होते.
अनोळखी 7 ते 8 ईसमांनी भास्कर मिसाळ यांचे गाडीला जॅक आडवा टाकल्याने गाडीचे चेंबर फुटून आईल गळाल्याने फिर्यादी यांनी गाडी बाजूला उभा करुन पाहत असताना अनोळखी 7 ते 8 इसमांनी गाडीजवळ येवून फिर्यादी व त्यांची पत्नी व नामेवाईक यांना लाथाबुक्यांनी मारहाण करुन त्यांचे अंगावरील सोन्या चांदीचे दागिने, दोन मोबाईल फोन, घड्याळ, रोख रक्कम 7,000₹ असा एकुण 4,71,650 ₹ किंमतीचा माल जबरीने काडून घेवून पसार झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-भास्कर मिसाळ यांनी दि.01.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 395 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मोटारसायकलची चोरी
धाराशिव : फिर्यादी नामे-प्रशांत बाबुराव इंगळे, वय 29 वर्षे, रा. दारफळ ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 10,000₹ किंमतीची काळ्या रंगाची ब्ल्यु पट्टा असलेली हिरो होंडा स्पेलंडर मोटरसायकल क्र एमएच 13 बी.यु. 2471 ही दि. 27.06.2024 रोजी सकाळी 09.00 ते 18.40 वा. सु. ॲक्सीस बॅक समोर छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रशांत इंगळे यांनी दि.01.07.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.द.वि.सं. कलम 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.