वाशी: वाशी तालुक्यातील सारोळा मांडवा येथे एसटी बस चालकाला मारहाण करण्यात आल्याची घटना दि. ३० डिसेंबर २०२४ रोजी घडली. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुदाम शेषराव मोहिते (वय ५२, रा. घोडकी) हे महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग विभागात चालक म्हणून कार्यरत आहेत. ते कळंब आगारातून बस क्रमांक एमएच २० बीएल १६२९ ही बस घेऊन कळंब-ईटकुरते-लिंग्गी-पिंपळगाव मार्गे जात असताना सारोळा मांडवा येथे बाबुराव मोरे (रा. सारोळा मांडवा) यांच्या कारने (क्रमांक एमएच १४ जी एच १२२७) त्यांच्या बसला रस्ता अडवला. यावरून बाबुराव मोरे यांनी सुदाम मोहिते यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करून जिवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी सुदाम मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात बाबुराव मोरे यांच्याविरुद्ध भादंवि कलम १३२, ११५, ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.