पक्या – ( खिडकीतून बाहेर डोकावत) अरे, भावड्या! बाहेर कसला गोंधळ चाललाय ? धाराशिवमध्ये कसल्या फटाकड्या वाजताहेत ?
भावड्या – ( चहा पीत बोलत) अरे पक्या! तुला नाही कळलं का अजून ? शिक्षण सम्राट सुधीर पाटीलनी आपला पक्षच बदलला ! इतके दिवस भाजपच्या गडात होते, आता शिवसेना (शिंदे) कडं गेलेत !
पक्या – (हसत) हं! हं! हा पाटील तर जणू सर्कशीतल्या जोकरसारखा आहे. चार वेळा पक्ष बदलला …
भावड्या – (गंभीरपणे) अरे पक्या, त्यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आशीर्वाद घेतलाय… म्हणजे त्यांच्या शिक्षण संस्थांसाठी काहीतरी मोठं चेंज होणार आहे.
पक्या – (हसत) म्हणजे शिंदे यांच्या आशीर्वादाने पुतळा वाचणार म्हण की … आणि अनधिकृत बिल्डिंग सुद्धा वाचणार …
भावड्या – (मुस्करात) अगदी बरोबर .. पक्या. आता तर खासदार ओमराजे निंबाळकरचे समर्थकही गडबड करतायत! धाराशिवचा भैय्या आणि कळंबचा आप्पा शिंदे गटाच्या मार्गावर आहे.
पक्या – पण या मार्गात तानाजी सावंत यांनी आडवे काटे लावलेत म्हणे…
भावड्या – लावणारच कि .. भैय्यांनी जाळलेला पुतळा आजून सावंत साहेबाच्या डोक्यातून गेला नाही …
पक्या – (चहा पिऊन) मंथन होईलच! पिठाच्या झरझरीसारखे हे राजकारण आहे. वळणावर वळण, झेंडा बदलणे हे ठरलेय. कुणाला चांगली पिठं मिळतील, तर कुणाला पिठीचा चुराडा!
भावड्या – (हसून) हं, हं! खरं आहे. तुला थोडक्यात सांगायचं तर, धाराशिवमध्ये आता राजकीय गडबडीचा नवा गेम सुरू झालाय.
पक्या – (चहा खाली ठेवून) तेव्हा, आपण कोणत्या झेंड्याखाली उभं रहायचं? ते एकदाचं ठरवू या…
भावड्या – : (हसत) हो, पक्या! नवा गेम म्हणजेच नवा प्लॅन. आपणही तयारीत राहूया!