धाराशिव: येडशी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 6 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना 26 जानेवारी रोजी पहाटे 4 ते 5 च्या सुमारास घडली. रफीक मुस्तफा फकीर (मिठाईवाले) यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे दागिने आणि 1 लाख 90 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 6 लाख 80 हजार रुपयांचा माल चोरुन नेण्यात आला आहे.
याप्रकरणी रफीक फकीर यांनी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी भादंवि कलम 331(3), 305 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
चोरट्यांनी फक्त रफीक फकीर यांच्याच नव्हे तर त्यांच्या शेजारी राहणाऱ्यांच्याही घरांमध्ये घरफोडी केल्याचे वृत्त आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
रामवाडीतून बुलेट चोरी
दिनांक २५ जानेवारीच्या रात्री रामवाडी येथील नागेश शेषेराव हाजगुडे यांच्या घरासमोरून त्यांची ५० हजार रुपये किमतीची रॉयल एनफिल्ड बुलेट (क्र. एमएच २४ एएम ८९८९) चोरीला गेली आहे. ही घटना २५ जानेवारी रात्री ११ ते २६ जानेवारी सकाळी ७.३० च्या दरम्यान घडली.
नागेश हाजगुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून चोरट्याचा शोध घेत आहेत.