धाराशिव: धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घाटंग्री येथील आश्रम शाळा चौकात 26 जानेवारी 2025 रोजी रात्री साडे दहा वाजता 16 जणांनी सार्वजनिक ठिकाणी हाणामारी करून शांतता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अविनाश शिंदे, कल्याण शिंदे, आदिनाथ खांडेकर, पिंटु शिंदे, नितीन शहाजी राठोड, आकाश डोलारे, संदीप राठोड, योगेश कल्याण शिंदे, प्रसाद खांडके, सचिन राठोड, अक्षय राठोड, विशाल राठोड, ओम चव्हाण, महेश राठोड, अजित राठोड, रोहण जाधव आणि इतर इसमांनी हाणामारी करून सार्वजनिक शांतता भंग केली. धाराशिव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले.
पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरून आरोपींविरुद्ध भादंवि कलम 144 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. जाधव करीत आहेत.
परंडा पोलिस ठाण्यात सहा जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
परंडा: परंडा तालुक्यातील वडणेर येथे 22 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी साडेसहा ते आठ वाजण्याच्या दरम्यान शेतात येण्याच्या कारणावरून एका महिलेसह तिघांना मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्रिशाला हणुमंत चौधरी (वय 55, रा. वडणेर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, महादेव गोवर्धन चौधरी, दत्तात्रय गोवर्धन चौधरी, लक्ष्मी दत्तात्रय चौधरी, रुपाली महादेव चौधरी, कुसुम गोवर्धन चौधरी आणि गोवर्धन मारुती चौधरी (सर्व रा. वडणेर) यांनी त्यांना, त्यांचे पती हणुमंत चौधरी आणि मुलगा सुरेश चौधरी यांना शेतात येण्याचे कारणावरून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकरणी त्रिशाला चौधरी यांनी 27 जानेवारी 2025 रोजी परंडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध भादंवि कलम 148(2), 145(2), 352, 354(2), 149(2), 147(2), 143 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेंबळीत तरुणावर चाकू हल्ला, जीवे मारण्याची धमकी
बेंबळी – बेंबळीतील उजनी रोडवरील मातोश्री हॉटेल येथे एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना २६ जानेवारी रोजी रात्री घडली. आकाश भारत शेळके (वय २७) असे हल्लेखोराचे नाव असून त्याने शाहरुख अन्वर कोतवाल (वय २७) या तरुणाला विनाकारण शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर चाकूने वार करून जखमी केले. एवढेच नाही तर आरोपीने शाहरुखला जीवे मारण्याची धमकीही दिली.
या घटनेनंतर शाहरुख कोतवाल यांनी बेंबळी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आकाश शेळके विरोधात भादंवि कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.