येरमाळा – बार्शी रोडवरील रुमणे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरलेल्या पैशाचे ट्रानजेक्शन दाखवण्याच्या कारणावरून मारामारी झाली. या मारामारीत पेट्रोल पंप मालक तुषार अशोक रुमणे (वय 39) यांना काही लोकांनी शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच, पंप झाळण्याची व जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी तुषार रुमणे यांनी येरमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार, किरण सोमनाथ कसबे व इतर चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भा. न्या. सं. कलम 189(2), 191(2), 115(2), 352, 351(2) (3) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरेवाडी येथे शेतजमिनीच्या वादातून मारामारी, गुन्हा दाखल
परंडा: दरेवाडी (ता. भूम, जि. धाराशिव) येथे १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ७ वाजता शेतजमिनीच्या वादातून दोन गटात मारामारी झाली. नागनाथ सोपान बोराडे (वय ६३) यांनी प्रभाकर वामन बोराडे आणि प्रविण प्रभाकर बोराडे यांना शिवीगाळ व मारहाण केली, तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागनाथ बोराडे यांच्याविरुद्ध भा. न्या. सं. कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.