येरमाळा – येरमाळा तालुक्यातील चोराखळी येथे एका भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. ट्रकचालकाच्या हयगयीमुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
भगवान नारायण मैंदाड आणि शारदा भगवान मैंदाड हे सोयाबीन काढून मोटरसायकलने घरी परतत असताना चोराखळी पाटीजवळ त्यांच्या मोटरसायकलला ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत मैंदाड दांपत्याचा जागीच मृत्यू झाला. तर शरद रासवे, आमिन शेख, यश कसबे, विजय जाधव, अक्षय कसबे, रमेश वाटोळे हे सहा जण जखमी झाले आहेत.अपघातानंतर ट्रकचालक जखमींना मदत न करता ट्रक घटनास्थळी सोडून पळून गेला. याप्रकरणी जयदीप भगवान मैंदाड यांनी येरमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मयत नामे-भगवान नारायण मैंदाड, शारदा भगवान मैंदाड रा. चोराखळी ता. कळंब जि. धाराशिव हे शेतातुन सोयाबीन काढून मोटरसायकलवरुन घराकडे जात होते. दरम्यान चोराखळी पाटीजवळ ट्रक क्र आर जे 06 जीसी 4952 चा चालकाने त्याचे ताब्यातील ट्रक ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून भगवान मैंदाड यांचे मोटरसायकलला धडक दिली.
या अपघातात भगवान मैंदाड व शारदा मैंदाड हे दोघे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर शरद रासवे, आमिन शेख, यश कसबे, विजय जाधव, अक्षय कसबे, रमेश वाटोळे हे सर्व किरकोळ व गंभीर जखमी झाले. ट्रॅक्टर व मोटरसायकलचे नुकसान केले. तसेच नमुद ट्रक चालक हा जखमीस उपचार कामी घेवून न जाता ट्रक जागेवर सोडून पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- जयदीप भगवान मैंदाड, वय 30 वर्षे, रा. चोराखळी ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.10.10.2024 दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281,125(अ), 125(बी) 106 (1), 324(4)(5) सह कलम 134 (अ) (ब),184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.