बेंबळी – बेंबळी येथे एका १५ वर्षीय मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रेया रामेश्वर इंगळे (वय १५, रा. राजुरी, ता. आंबेवाडी, जि. धाराशिव) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. तिने २० ऑक्टोबर रोजी बेंबळी येथील कांताराम कुलकर्णी यांच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
ओम गुणवंत कदम (रा. आंबेवाडी, ता. जि. धाराशिव) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. आरोपी ओम कदम हा मागील काही दिवसांपासून श्रेयाचा पाठलाग करून तिला त्रास देत होता. तो तिला वारंवार फोन करून बोलत होता आणि तिला भेटण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून श्रेयाने आत्महत्या केली असा आरोप आहे.
याप्रकरणी श्रेयाच्या नातेवाईक छाया पांडुरंग जाधव (वय ६०, रा. आंबेवाडी, ता. जि. धाराशिव) यांनी बेंबळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ओम कदम विरोधात भादंवि कलम १०७, ७८(२) सह कलम १२ बाल लैंगिक अत्याचार अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.