• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, April 20, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

मसला खुर्द येथील शासकीय सभागृह पाडकाम प्रकरण: दोन महिने उलटूनही कारवाई शून्य; प्रशासनाचा दोषींना ‘वरदहस्त’?

राजकीय दबावामुळे अधिकारी हतबल? चौकशी अहवाल दडपल्याचा संशय

admin by admin
November 27, 2025
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
मसला खुर्द येथील शासकीय सभागृह पाडकाम प्रकरण: दोन महिने उलटूनही कारवाई शून्य; प्रशासनाचा दोषींना ‘वरदहस्त’?
0
SHARES
216
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द येथे शासकीय सभागृह पाडण्यात आल्याच्या गंभीर घटनेला दोन महिने उलटून गेले आहेत. मात्र, अद्याप या प्रकरणी संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या प्रकरणी पोलीस अधीक्षकांना पत्र देऊनही पोलीस प्रशासनाकडून हालचाल होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रशासनच दोषींना अभय देत असल्याचा आरोप आता ग्रामस्थांकडून होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मसला खुर्द येथे शासकीय निधीतून बांधलेले सभागृह पाडण्यात आले होते. या गंभीर प्रकाराची दखल घेत ३ नोव्हेंबर २०२५ रोजी चौकशी अधिकारी ए.सी. कावळे यांच्यामार्फत चौकशी पूर्ण करण्यात आली. मात्र, चौकशी होऊन अनेक दिवस लोटले तरी कावळे यांनी आपला अहवाल अद्याप गटविकास अधिकाऱ्यांकडे (BDO) सादर केलेला नाही. अहवाल सादर करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याने प्रशासनाच्या हेतूवर शंका उपस्थित होत आहे.

आमदारांच्या दबावामुळे कारवाई रखडली?

या प्रकरणात मोठा राजकीय हस्तक्षेप होत असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक आमदार राणा पाटील यांचा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव असल्यानेच कारवाईस विलंब होत असल्याची चर्चा तालुक्यात जोरात सुरू आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्या स्तरावरूनही या प्रकरणात कोणतीही कारवाई झालेली नाही.

शासकीय मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या दोषी व्यक्तींना पाठीशी न घालता, प्रशासनाने राजकीय दबावाला बळी न पडता लवकरात लवकर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मसला खुर्द येथील जनतेतून होत आहे.

Previous Post

श्रेयासाठी ‘कल्ला’ करणाऱ्यांनो, शेतकऱ्यांच्या पराभवावर ‘मूक गिळून’ का बसलात?

Next Post

तामलवाडीत ‘पिंक पथका’ची धडक कारवाई; २ लाख ६१ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकावर गुन्हा दाखल

Next Post
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

तामलवाडीत ‘पिंक पथका’ची धडक कारवाई; २ लाख ६१ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

पवनराजे निंबाळकर हत्याकांड: युक्तिवाद संपला, आता निकालाची प्रतीक्षा; २४ मार्चला तारीख ठरणार

कै. पवनराजे निंबाळकर हत्याकांड: तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर १४ मे रोजी लागणार निकाल; संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष!

April 20, 2026
महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

April 20, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कपडे खरेदीचा बहाणा करून दुकानातून १ लाख ९० हजारांची रोकड पळवली

April 20, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

महाळंगीत किरकोळ वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

April 20, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

१५ लाखांची खंडणी मागत कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण; जिवे मारण्याची धमकी, तिघांवर गुन्हा दाखल

April 20, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group