• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, April 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘शेत का विकले?’ या रागातून प्रौढास दगडाने मारहाण; चिंचपूर ढगे येथील घटनेप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

admin by admin
April 22, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन
0
SHARES
144
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

भूम : ‘तू आमचे शेत का विकले?’ अशी विचारणा करत झालेल्या वादातून तिघांनी मिळून एका ५६ वर्षीय प्रौढाला लाथाबुक्क्यांनी व दगडाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना चिंचपूर ढगे (ता. भूम) येथे घडली. याप्रकरणी भूम पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. २१) तिघा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिमान संदिपान ढगे (वय ५६, रा. चिंचपूर ढगे, ता. भूम, जि. धाराशिव) असे मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या फिर्यादीचे नाव आहे. तर महेश मोहन येडे, समाधान सुरेश येडे आणि विलास युवराज येडे (सर्व रा. चिंचपूर ढगे) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

८ एप्रिल २०२६ रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास चिंचपूर ढगे येथील भैरू शिंदे यांच्या रसवंतीजवळ फिर्यादी अभिमान ढगे हे उपस्थित होते. त्यावेळी नमूद केलेल्या तीनही आरोपींनी संगनमत करून त्यांना गाठले. ‘तू आमचे शेत का विकले?’ या कारणावरून त्यांनी ढगे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्यानंतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी तसेच दगडाने बेदम मारहाण केली, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले.

या घटनेनंतर उपचाराअंती, अभिमान ढगे यांनी मंगळवारी (ता. २१ एप्रिल) भूम पोलिसांत धाव घेत आपबिती सांगितली. त्यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून महेश येडे, समाधान येडे आणि विलास येडे या तिघांविरुद्ध भूम पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भूम पोलिस करत आहेत.

Previous Post

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, जीवे मारण्याची धमकी; तरुणावर गुन्हा दाखल

Next Post

जुन्या वादातून महिलेस दगडाने मारहाण, जीवे मारण्याची धमकी; तुगाव येथील घटनेप्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल

Next Post
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

जुन्या वादातून महिलेस दगडाने मारहाण, जीवे मारण्याची धमकी; तुगाव येथील घटनेप्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात गुन्हेगारांचा सुळसुळाट; घरफोडी, चोरीसह ट्रॅक्टर पळविण्याचा प्रयत्न

April 22, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

जुन्या वादातून महिलेस दगडाने मारहाण, जीवे मारण्याची धमकी; तुगाव येथील घटनेप्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल

April 22, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

‘शेत का विकले?’ या रागातून प्रौढास दगडाने मारहाण; चिंचपूर ढगे येथील घटनेप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

April 22, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, जीवे मारण्याची धमकी; तरुणावर गुन्हा दाखल

April 22, 2026
धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

April 22, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group