• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, September 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

रेशनचा माल मागितल्याच्या कारणावरून बाभळगावात एकाला लोखंडी सळईने बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

admin by admin
April 24, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

येरमाळा : रेशनचा माल मागितल्याच्या कारणावरून एकाला शिवीगाळ करत लोखंडी सळई आणि लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याची घटना कळंब तालुक्यातील बाभळगाव शिवारात घडली. याप्रकरणी गुरुवारी (दि. २३) येरमाळा पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिगंबर नरहरी बेडके (वय ४२, रा. बाभळगाव, ता. कळंब, जि. धाराशिव) असे मारहाण होऊन जखमी झालेल्या फिर्यादीचे नाव आहे. दि. १८ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास बाभळगाव शिवारात हा प्रकार घडला. फिर्यादी दिगंबर बेडके यांनी रेशनचा माल मागितल्याच्या कारणावरून आरोपी प्रेमनाथ मधुकर वाघमारे, राम मधुकर वाघमारे (दोघे रा. बाभळगाव, ता. कळंब), अक्षय विष्णू धोंगडे (रा. धारूर, ता. धारूर, जि. बीड) आणि लिंबराज बोबडे (रा. बोबडेवाडी, ता. केज, जि. बीड) यांनी त्यांच्याशी वाद घातला.

या वादानंतर संतप्त झालेल्या आरोपींनी फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच, लाथाबुक्क्यांनी, लोखंडी सळई आणि लाकडी काठीने जबर मारहाण करून दिगंबर यांना जखमी केले. एवढ्यावरच न थांबता या चौघांनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.

या घटनेनंतर, दिगंबर बेडके यांनी दि. २३ एप्रिल रोजी पोलिसांत धाव घेत प्रथम खबर दिली. या फिर्यादीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात चारही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३५१(२), (३) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत.

Previous Post

१० लाखांच्या खंडणीसाठी कापला १३२ केव्हीचा वीज टॉवर; १ कोटी २० लाखांचे नुकसान, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post

जिल्ह्यात गुटखा तस्करांवर पोलिसांची धडक कारवाई; वाशी व ढोकीत तब्बल १३ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त

Next Post
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

जिल्ह्यात गुटखा तस्करांवर पोलिसांची धडक कारवाई; वाशी व ढोकीत तब्बल १३ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

September 17, 2026
‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!

‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!

September 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

September 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : पैशांच्या व्यवहारावरून तरुणाला कोयत्याने मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ

September 17, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

पाथरुड-पाटसांगवी रोड : हॉटेल सह्याद्रीवर भूम पोलिसांची धडक धाड; गांजासह देशी-विदेशी दारूचा साठा जप्त

September 17, 2026

Recent Posts

  • ‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!
  • ‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!
  • उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
  • तुळजापूर : पैशांच्या व्यवहारावरून तरुणाला कोयत्याने मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ
  • पाथरुड-पाटसांगवी रोड : हॉटेल सह्याद्रीवर भूम पोलिसांची धडक धाड; गांजासह देशी-विदेशी दारूचा साठा जप्त
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!