• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, June 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

जिल्ह्यात गुटखा तस्करांवर पोलिसांची धडक कारवाई; वाशी व ढोकीत तब्बल १३ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त

admin by admin
April 24, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
0
SHARES
366
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : राज्यात शासनाने गुटखा विक्री आणि वाहतुकीवर कडक बंदी घातलेली असतानाही, छुप्या मार्गाने राजरोसपणे गुटख्याचा काळाबाजार सुरूच असल्याचे उघडकीस आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील वाशी आणि ढोकी पोलिसांच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाया करत तब्बल १३ लाख ८२ हजार ९९० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व दोन वाहने असा मुद्देमाल जप्त केला आहे. गुरुवारी (दि. २३) झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे जिल्ह्यातील गुटखा माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

वाशीत १३ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त

पहिली आणि मोठी कारवाई वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रुई शिवारात करण्यात आली. रुई शिवारातील कॅनलजवळून मोठ्या प्रमाणावर गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती वाशी पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी दुपारी १२:४८ वाजेच्या सुमारास पोलिसांनी सापळा रचून महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. एमएच २३ ए.यु. ११९१) आणि अशोक लेलँड पिकअप (क्र. एमएच २३ ए.यु. ३४३९) या दोन वाहनांची तपासणी केली.

या वाहनांमध्ये ‘प्रिमियम शॉट लक्झरी टोबॅको’चे लाल-हिरव्या रंगाचे तब्बल ७४०४ पाऊच आढळून आले. पोलिसांनी ४ लाख ७० हजार ८८० रुपयांचा गुटखा आणि दोन्ही वाहने असा एकूण १३ लाख ७० हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी वाहन चालकांवर वाशी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि अन्न सुरक्षा मानके अधिनियमाच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पळसप येथे १२ हजारांचा गुटखा पकडला

दुसरी कारवाई ढोकी पोलिसांनी पळसप (ता. धाराशिव) येथे केली. गुरुवारी सायंकाळी ६:३५ वाजेच्या सुमारास पोलिसांनी पळसप येथे टाकलेल्या छाप्यात आरोपी राजाभाऊ व्यंका माळी आणि सलीम अलम शेख (वय ४३, दोघे रा. पळसप) यांच्याकडे प्रतिबंधित गुटखा आढळून आला.

आरोपींकडे विक्रीसाठी बाळगलेला विमल पान मसाला, व्ही-१ टोबॅको, बादशाहा गुटखा, लक्झरी टोबॅको, आणि के.एम. १ जाफरानी जर्दा असा एकूण १२ हजार ११० रुपये किमतीचा माल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध ढोकी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम २२३, २७५ आणि अन्न सुरक्षा मानके अधिनियम कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या या धडक कारवायांमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, पुढील तपास वाशी आणि ढोकी पोलीस करत आहेत.

Previous Post

रेशनचा माल मागितल्याच्या कारणावरून बाभळगावात एकाला लोखंडी सळईने बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

Next Post

कत्तलीसाठी चाललेली ४० गोवंशीय वासरे परंड्यात जप्त; ९ लाखांच्या मुद्देमालासह एकास अटक

Next Post
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

कत्तलीसाठी चाललेली ४० गोवंशीय वासरे परंड्यात जप्त; ९ लाखांच्या मुद्देमालासह एकास अटक

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंड्यात घरात कोयते बाळगणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल

June 13, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

नळदुर्ग परिसरात सोलर कंपनीची ८० हजारांची केबल लंपास; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

June 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

अचलेर तांड्यावर जुन्या वादातून हाणामारी;  सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

June 13, 2026
गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसांसह तरुण जेरबंद!

गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसांसह तरुण जेरबंद!

June 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापुरात खळबळजनक! वयोवृद्ध शेतकऱ्याकडे ५ लाखांची खंडणी; ‘ॲट्रॉसिटी’ अन् छेडछाडीच्या खोट्या केसची धमकी

June 12, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group