• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

इतरांची उचलबांगडी, मग मांजरे यांना अभय का? लाच प्रकरणात तुळजापूरचे प्रभारी अधिकारी सुरक्षित

'धाराशिव लाईव्ह'च्या माहिती अधिकारात मोठा खुलासा

admin by admin
May 19, 2026
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
इतरांची उचलबांगडी, मग मांजरे यांना अभय का? लाच प्रकरणात तुळजापूरचे प्रभारी अधिकारी सुरक्षित
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: तुळजापूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस फौजदार श्रीनिवास आरदवाड यांना ५ हजार रुपयांची लाच घेताना निलंबित करण्यात आले. मात्र, या गंभीर प्रकरणानंतरही पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी  अण्णासाहेब मांजरे यांच्यावर वरिष्ठ स्तरावरून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ‘धाराशिव लाईव्ह’ने माहिती अधिकारात (RTI) विचारलेल्या प्रश्नावर खुद्द पोलीस अधीक्षक कार्यालयानेच हे लेखी उत्तर दिले आहे.

इतर अधिकाऱ्यांचा न्याय मांजरे यांना का नाही?

धाराशिव शहर पोलीस स्टेशनसह जिल्ह्यातील इतर काही पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी लाचेचे प्रकरण घडल्यानंतर, वरिष्ठांनी तात्काळ कारवाई करत संबंधित प्रभारी अधिकाऱ्यांची पोलीस मुख्यालयात उचलबांगडी केली होती. कर्मचाऱ्याने लाच घेतल्यास प्रभारी अधिकाऱ्याला जबाबदार धरण्याची पद्धत असताना, तुळजापूरच्या बाबतीत मात्र हा नियम का बदलला? लाचखोरीचा प्रकार घडूनही अण्णासाहेब मांजरे यांना अभय का दिले जात आहे? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

माहिती अधिकारात नेमके काय उघड झाले?

‘धाराशिव लाईव्ह’चे संपादक सुनील ढेपे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे माहिती अधिकारात दोन प्रमुख मुद्दे विचारले होते.

१) सपोफौ एस.आर. आरदवाड यांना निलंबित करण्यात आले आहे काय? आणि त्या आदेशाची प्रत मिळावी.

२) तुळजापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अण्णासाहेब मांजरे यांच्यावर वरिष्ठ स्तरावरून काय कारवाई करण्यात आली आहे?

यावर पोलीस अधीक्षक कार्यालयातील विभागीय चौकशी शाखेने (दिनांक ६ मे २०२६ रोजी) दिलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट केले आहे की, आरदवाड यांना निलंबित करण्यात आले आहे. परंतु, दुसऱ्या प्रश्नावर उत्तर देताना, “प्रभारी अधिकारी श्री. अण्णासाहेब मांजरे यांच्यावर वरिष्ठ स्तरावरून काय कारवाई करण्यात आली याबाबत या कार्यालयास काहीएक माहिती नाही,” अशी स्पष्ट कबुली दिली आहे.

पोलीस वर्तुळात उलट-सुलट चर्चा

एकीकडे लाचखोरीच्या प्रकरणात इतर पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांवर तात्काळ कारवाईचा बडगा उगारला जातो, तर दुसरीकडे मांजरे यांच्यावर कारवाईबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयालाच ‘काहीएक माहिती नाही‘, हा प्रकार अनेक प्रश्न निर्माण करणारा आहे. मांजरे यांना कोणाचे पाठबळ आहे आणि त्यांना जाणीवपूर्वक का वाचवले जात आहे? यावरून आता धाराशिव जिल्ह्यात आणि पोलीस वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. प्रशासकीय पारदर्शकतेवरच यामुळे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


Previous Post

शिक्षणाच्या मंदिरात ‘पाकिटांची’ कमाल! धाराशिवच्या नामांकित महाविद्यालयात छेडछाडीचे प्रकरण ‘डील’ करून रफादफा!

Next Post

दोन गावठी कट्टे अन् चोरीच्या दुचाकीसह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Next Post
दोन गावठी कट्टे अन् चोरीच्या दुचाकीसह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

दोन गावठी कट्टे अन् चोरीच्या दुचाकीसह एकास अटक; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

ताज्या बातम्या

तुळजाभवानी मंदिर प्रकरण: भाजप नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना जिल्हाधिकाऱ्यांची ‘कारणे दाखवा’ नोटीस

तुळजाभवानी मंदिर प्रकरण: भाजप नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना जिल्हाधिकाऱ्यांची ‘कारणे दाखवा’ नोटीस

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजाभवानी मंदिर परिसरात चोरीच्या दोन घटना; दोन महिला ताब्यात

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात दोन विवाहित पुरुषांचे अपहरण; लोहारा आणि परंडा पोलिसांत गुन्हे दाखल

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

वाशी : टेम्पोतील कोऱ्या चेकवर खोटी सही करून लावला ८ लाखांचा चुना

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

अणदूर : बेकायदेशीर ताडीत (शिंदी) गुंगीचे औषध मिसळल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

October 16, 2026

Recent Posts

  • तुळजाभवानी मंदिर प्रकरण: भाजप नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना जिल्हाधिकाऱ्यांची ‘कारणे दाखवा’ नोटीस
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात चोरीच्या दोन घटना; दोन महिला ताब्यात
  • धाराशिव जिल्ह्यात दोन विवाहित पुरुषांचे अपहरण; लोहारा आणि परंडा पोलिसांत गुन्हे दाखल
  • वाशी : टेम्पोतील कोऱ्या चेकवर खोटी सही करून लावला ८ लाखांचा चुना
  • अणदूर : बेकायदेशीर ताडीत (शिंदी) गुंगीचे औषध मिसळल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!