• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, September 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव सायबर पोलिसांची मोठी कामगिरी! ऑनलाईन फसवणुकीतील १९ लाखांची रक्कमेचा लागला छडा

 भावांचे अ‍ॅपेक्स अकाऊंट गोठवून पैसे केले परत

admin by admin
July 25, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकून ऑनलाईन फसवणुकीचे बळी ठरलेल्या नागरिकांसाठी धाराशिव सायबर पोलिसांची कामगिरी दिलासादायक ठरली आहे. ऑनलाईन आर्थिक फसवणुकीत गमावलेले तब्बल १९ लाख रुपये सायबर पोलीस ठाण्याच्या तत्परतेमुळे मूळ फिर्यादींना सुखरूप परत मिळवून देण्यात यश आले आहे. पोलिसांच्या या धडक आणि तातडीच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

भावांची झाली होती १९ लाखांची फसवणूक

पोलिसांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील अणदूर (वत्सलानगर) येथील रहिवासी मोहित सिद्धेश्वर भुजबळ आणि रोहित सिद्धेश्वर भुजबळ या दोन भावांची ऑनलाईन भामट्यांनी फसवणूक केली होती.

सायबर गुन्हेगारांनी विविध क्लृप्त्या वापरून मोहित भुजबळ यांचे १४,००,००० रुपये (१४ लाख) आणि रोहित भुजबळ यांचे ५,००,००० रुपये (५ लाख) अशी एकूण १९ लाख रुपयांची भलीमोठी रक्कम ऑनलाईन पद्धतीने लांबवली होती. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दोन्ही भावांनी तात्काळ ‘एनसीसीआर’ (NCCR) पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवली.

खाती केली गोठवली; नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रक्कम केली हस्तगत

तक्रार प्राप्त होताच धाराशिव सायबर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सायबर पथकाने तातडीने संबंधित बँकांशी अधिकृत पत्रव्यवहार केला आणि फसवणुकीचे पैसे वर्ग झालेल्या आरोपींच्या विविध बँक खात्यांचा शोध घेऊन ती सर्व खाती (Accounts) तात्काळ गोठवली (Freeze).

यानंतर बँकांच्या नोडल अधिकाऱ्यांशी सतत पाठपुरावा आणि संपर्क साधून कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आली. परिणामी, मोहित आणि रोहित भुजबळ यांचे फसवणूक झालेले संपूर्ण १९ लाख रुपये पुन्हा त्यांच्या मूळ बँक खात्यात सुरक्षितपणे वर्ग करण्यात धाराशिव सायबर पोलिसांना यश आले.

अधिकारी व पथकाचे कौतुक

सदरची उल्लेखनीय कामगिरी धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर मॅडम आणि अप्पर पोलीस अधीक्षक  सचिन पांडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक कासुळे, पोलीस अंमलदार सूर्यवंशी (बकल नं. ६४०), पोलीस हवालदार हालसे (बकल नं. ११२९), पोलीस अंमलदार जाधवर (बकल नं. १०३६), महिला पोलीस अंमलदार शेख (बकल नं. ७१८), पोलीस अंमलदार बिराजदार (बकल नं. १६५), गाडे (बकल नं. ८०) आणि शिंदे (बकल नं. ९७१) यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

धाराशिव सायबर पोलिसांचे आवाहन:

“कोणत्याही अनोळखी मोबाईल क्रमांकावरून आलेला मेसेज, संशयास्पद लिंक, फोन किंवा क्यूआर कोडवर (QR Code) खात्री केल्याशिवाय विश्वास ठेवू नका. आपल्या बँक खात्याशी संबंधित कोणतीही माहिती किंवा ओटीपी (OTP) कोणालाही देऊ नका. सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ ‘१९३०’ या राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करा किंवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवून सायबर पोलीस ठाणे, धाराशिव येथे संपर्क साधावा.”

Previous Post

तांत्रिक निकष रद्द करून पीक कापणी प्रयोगाच्या आधारे शेतकऱ्यांना १०६८ कोटींचा विमा द्या

Next Post

धाराशिव शहरात २ अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांची मोठी कारवाई!

Next Post
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव शहरात २ अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांची मोठी कारवाई!

ताज्या बातम्या

पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

September 18, 2026
एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

September 18, 2026
‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

September 17, 2026
‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!

‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!

September 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

September 17, 2026

Recent Posts

  • पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR
  • एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल
  • ‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!
  • ‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!
  • उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!