• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

ठाकरे गटाच्या ‘डॉन’चा दणका, ऑपरेशन लोटस फुस्स अन् अमित शिंदेंचा ‘माईंड गेम’!

धाराशिव भाजप 'कुरुक्षेत्र' नवा अंक: 15

admin by admin
August 26, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
ठाकरे गटाच्या ‘डॉन’चा दणका, ऑपरेशन लोटस फुस्स अन् अमित शिंदेंचा ‘माईंड गेम’!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिवच्या राजकीय पटावर सध्या साहेबांच्या (आमदार राणा पाटील) ‘ऑपरेशन लोटस’चा धुमाकूळ सुरू होता. कळंबमध्ये ठाकरे गटाचे ९ नगरसेवक गळाला लागल्याने साहेबांचा आत्मविश्वास एवढा वाढला होता की, त्यांनी थेट धाराशिव नगरपालिकेत ‘ऑपरेशन लोटस २.०’ चा घाट घातला! पण, यावेळी साहेबांचा ‘प्लॅन’ कसा फसला आणि घरातल्याच निष्ठावंतांनी कसा ‘माईंड गेम’ सुरू केलाय, याची ही इनसाइड स्टोरी एखाद्या सस्पेन्स थ्रिलरलाही लाजवणारी आहे.

ऑपरेशन लोटस २.०: पुण्यातूनच गाडीला ‘यू-टर्न’ अन् ‘डॉन’चा दम!

कळंबच्या यशानंतर धाराशिव पालिकेतील ठाकरे गटाचे ४ नगरसेवक साहेबांनी हेरले. ठरल्याप्रमाणे या चारही जणांना गाडीत बसवून गुपचूप मुंबईला पळवून नेण्याचा प्लॅन सुरू झाला. गाडी पुण्यात पोहोचली, पण तिथेच पिक्चरमध्ये एक भन्नाट ट्विस्ट आला!

ठाकरे गटाच्या एका स्थानिक ‘डॉन’ ची थेट पुण्यात या नगरसेवकांच्या गाडीला एन्ट्री (किंवा फोनवरून थेट संपर्क) झाली. या डॉनने असा काही सज्जड दम भरला की, भल्याभल्यांची हवाच गुल झाली. “तुम्ही प्रवेश करूनच दाखवा, मग तुमचं काय करायचं ते मी पाहतो!” असा एका वाक्याचा कडक निरोप या डॉनने दिला. मग काय? १ कोटींचे स्वप्न पाहणारे हे चारही नगरसेवक पुण्यातूनच शेपूट घालून ‘गुमान’ धाराशिवला परतले! आणि अशा प्रकारे साहेबांचे ‘ऑपरेशन लोटस २.०’ अक्षरशः फुस्स झाले.

‘बाहेरच्यांना रेड कार्पेट, घरातल्यांना ठेंगा!’

एकीकडे बाहेरचे नगरसेवक फोडण्यासाठी साहेबांची ‘साम-दाम-दंड-भेद’ नीती सुरू असताना, दुसरीकडे घरातल्याच निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांना मात्र ‘गृहीत’ धरले जात असल्याने प्रचंड खदखद आहे.

सगळ्यात मोठा घोळ सुरू आहे तो ‘उपनगराध्यक्ष’ पदाचा! सत्ता आल्यावर सर्वांना संधी मिळावी म्हणून ‘दर सहा महिन्याला उपनगराध्यक्ष बदलण्याचा’ अलिखित करार झाला होता. विद्यमान उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा सहा महिन्यांचा कार्यकाळ संपून आता वरती दोन महिने उलटून गेले आहेत. पण ढोबळेंना खुर्चीवरून कधी उठवणार आणि नव्या इच्छुकांना संधी कधी देणार? यावर साहेबांच्या गोटातून ‘ब्र’ सुद्धा काढला जात नाहीये.

अमित शिंदेंची ‘फिल्डिंग’ अन् डोक्यातल्या खेळाची ‘रील’!

या उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपचे गटनेते आणि माजी नगराध्यक्ष अमित शिंदे यांनी तगडी फिल्डिंग लावली आहे. पण साहेबांकडून ‘चालढकल’ सुरू असल्याने आता शिंदेंचा संयम सुटला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून अमित शिंदे यांनी स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केलेल्या एका ‘रील’ने (Reel) पालिकेच्या राजकीय वर्तुळात भूकंप आणला आहे. या रीलमध्ये अत्यंत सूचक आणि डेंजरस संदेश देण्यात आला आहे:

“चुकून जर डोक्यात चाललेला खेळ यशस्वी झाला, तर नजारा बघण्यासारखी असेल!”

आता शिंदेंच्या डोक्यात नेमका कोणता ‘गेमप्लॅन’ सुरू आहे? हा खेळ साहेबांना ‘चेकमेट’ देण्यासाठी आहे की पालिकेत नवा ‘भूकंप’ आणण्यासाठी? यावर तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

सारवासारव की राजकीय ‘इशारा’?

जेव्हा या व्हायरल रीलबाबत अमित शिंदे यांना विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी राजकारणातला सगळ्यात क्लासिक डायलॉग मारला. ते हसून म्हणाले, “तसं काही नाही हो… कार्यकर्ते अशा रील्स तयार करतात, मी फक्त शेअर केली. त्यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही!”

पण राजकारणात शब्दांपेक्षा संकेतांना आणि टायमिंगला जास्त महत्त्व असते, हे सर्वांनाच माहीत आहे! एकीकडे पक्षाचे साहेब ‘ऑपरेशन लोटस’मध्ये बिझी असताना, दुसरीकडे स्वतःच्याच पक्षाच्या गटनेत्याने “डोक्यातल्या खेळाचा नजारा बघण्यासारखा असेल” असा इशारा देणे, हा काही साधा योगायोग नक्कीच नाही!

थोडक्यात सांगायचे तर, बाहेरचे नगरसेवक फोडता फोडता साहेबांच्या स्वतःच्याच घरात (पालिकेत) आता सुरुंग लागण्याची वेळ आली आहे. अमित शिंदेंचा हा ‘डोक्यात चाललेला खेळ’ जर चुकून यशस्वी झाला, तर धाराशिव नगरपालिकेत खरंच असा काही ‘नजारा’ दिसेल, की साहेबांनाही तो बघवत नाही अन् सांगताही येणार नाही!

(पुढील भागात: शिंदेंचा गेमप्लॅन काय असणार आणि साहेबांची पुढची खेळी काय? वाचा लवकरच!)

Previous Post

तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;

Next Post

‘ऑपरेशन लोटस’ फुस्स, आता ‘ऑपरेशन टायगर’ची डरकाळी! आलिशान गाडीत राडा अन् मल्हार पाटलांचा संताप!

Next Post
भाजपच्या राड्यानंतर आता शिंदे गटात ‘बॉम्ब’ फुटणार; धाराशिवचं नवं पॉवर-प्ले: शिंदे गटात ‘जुने विरुद्ध नवे’ संघर्ष अटळ!

'ऑपरेशन लोटस' फुस्स, आता 'ऑपरेशन टायगर'ची डरकाळी! आलिशान गाडीत राडा अन् मल्हार पाटलांचा संताप!

ताज्या बातम्या

तुळजाभवानी मंदिर प्रकरण: भाजप नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना जिल्हाधिकाऱ्यांची ‘कारणे दाखवा’ नोटीस

तुळजाभवानी मंदिर प्रकरण: भाजप नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना जिल्हाधिकाऱ्यांची ‘कारणे दाखवा’ नोटीस

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजाभवानी मंदिर परिसरात चोरीच्या दोन घटना; दोन महिला ताब्यात

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात दोन विवाहित पुरुषांचे अपहरण; लोहारा आणि परंडा पोलिसांत गुन्हे दाखल

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

वाशी : टेम्पोतील कोऱ्या चेकवर खोटी सही करून लावला ८ लाखांचा चुना

October 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

अणदूर : बेकायदेशीर ताडीत (शिंदी) गुंगीचे औषध मिसळल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

October 16, 2026

Recent Posts

  • तुळजाभवानी मंदिर प्रकरण: भाजप नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना जिल्हाधिकाऱ्यांची ‘कारणे दाखवा’ नोटीस
  • तुळजाभवानी मंदिर परिसरात चोरीच्या दोन घटना; दोन महिला ताब्यात
  • धाराशिव जिल्ह्यात दोन विवाहित पुरुषांचे अपहरण; लोहारा आणि परंडा पोलिसांत गुन्हे दाखल
  • वाशी : टेम्पोतील कोऱ्या चेकवर खोटी सही करून लावला ८ लाखांचा चुना
  • अणदूर : बेकायदेशीर ताडीत (शिंदी) गुंगीचे औषध मिसळल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!