• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;

भाविकाभिमुख सेवा देण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना

admin by admin
August 25, 2026
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिराच्या सुरक्षा व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी आता महाराष्ट्र सुरक्षा बलाचे (MSF) विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. या पथकात ११६ अधिकारी व जवानांचा समावेश असून, त्यांनी भाविकांशी सौजन्याने वागून त्यांना सुरक्षिततेचा विश्वास द्यावा, अशा सूचना वरिष्ठ पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिल्या.

कर्तव्यावर रुजू होण्यापूर्वी एमएसएफच्या अधिकारी व जवानांनी तुळजापूर शहर आणि मंदिर परिसरातून रूट मार्च काढला. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करून त्यांना मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील, तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, मंदिर चौकीचे निरीक्षक येवते तसेच एमएसएफचे सुरक्षा अधिकारी प्रदीप पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

भाविकांशी सौजन्याने वागा : पांडकर

अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी जवानांना मार्गदर्शन करताना सांगितले की, भाविकांशी अत्यंत सौजन्यपूर्ण वर्तन ठेवून त्यांच्यात सुरक्षा व्यवस्थेबाबत विश्वासाचे वातावरण निर्माण केले पाहिजे. उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना देवीने प्रदान केलेल्या भवानी तलवारीचा संदर्भ देत, या पवित्र भूमीत देवीचा आशीर्वाद घेऊन निष्ठेने कर्तव्य बजावण्याचे आवाहन केले.

प्रथा, परंपरांचा आदर राखा

तहसीलदार माया माने यांनी मंदिरातील धार्मिक प्रथा आणि विधींची माहिती जवानांना दिली. सुरक्षेचे काम करताना मंदिराच्या परंपरांची जाणीव ठेवून भाविकांशी संवेदनशीलतेने वागण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तर, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे आणि निरीक्षक येवते यांनी सण-उत्सव, सलग सुट्ट्यांच्या दिवशी वाढणारी गर्दी, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा आणि पोलीस व एमएसएफ यांच्यातील समन्वयाबाबत मार्गदर्शन केले.

असे आहे एमएसएफचे बळ…

मंदिर सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या ११६ जवानांच्या पथकात ६ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये १ पोलीस निरीक्षक, ४ पोलीस उपनिरीक्षक आणि १ सहायक पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी आहेत. या पथकात महिला अधिकारी व सुरक्षा जवानांचाही समावेश असल्याने मंदिर परिसरातील गर्दी नियंत्रण आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळणे अधिक सोयीचे होणार आहे.

‘एमएसएफ’ला पोलिसांचे अधिकार

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अधिनियम, २०१० अंतर्गत एमएसएफ जवानांना कायद्याने ‘विशेष पोलीस अधिकारी’ दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षा कर्तव्य बजावताना अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आणि संशयितांना वॉरंटशिवाय ताब्यात घेऊन स्थानिक पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे विशेष कायदेशीर अधिकार या दलाला प्राप्त आहेत. या अधिकारांमुळे मंदिर परिसरातील सुरक्षेला मोठी मदत मिळणार आहे.

Previous Post

धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त

Next Post

ठाकरे गटाच्या ‘डॉन’चा दणका, ऑपरेशन लोटस फुस्स अन् अमित शिंदेंचा ‘माईंड गेम’!

Next Post
ठाकरे गटाच्या ‘डॉन’चा दणका, ऑपरेशन लोटस फुस्स अन् अमित शिंदेंचा ‘माईंड गेम’!

ठाकरे गटाच्या 'डॉन'चा दणका, ऑपरेशन लोटस फुस्स अन् अमित शिंदेंचा 'माईंड गेम'!

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

September 13, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर

September 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

हिंगळजवाडी : शेतातील गवत व झुडपे काढण्यावरून ७५ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाड अन् खोऱ्याने प्राणघातक हल्ला; ५ जणांवर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल

September 12, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

पश्चिम लोहटा : ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाच्या बाजूने हात वर केल्याने ग्रामस्थाला मारहाण; ८ जणांवर शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल

September 12, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

भूम : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला बालविवाह; पीडिता गर्भवती, पतीसह नातेवाइकांवर पोक्सो अन् बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

September 12, 2026

Recent Posts

  • आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद
  • बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर
  • हिंगळजवाडी : शेतातील गवत व झुडपे काढण्यावरून ७५ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाड अन् खोऱ्याने प्राणघातक हल्ला; ५ जणांवर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल
  • पश्चिम लोहटा : ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाच्या बाजूने हात वर केल्याने ग्रामस्थाला मारहाण; ८ जणांवर शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल
  • भूम : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला बालविवाह; पीडिता गर्भवती, पतीसह नातेवाइकांवर पोक्सो अन् बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!