• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 24, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये ‘दुष्काळ’ नव्हे, आमदारांच्या ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चीच पाहणी!

 लातूर, सोलापूर हिट; पण भाजप आमदाराच्या नाकर्तेपणामुळे मुख्यमंत्र्यांचा धाराशिव दौरा ठरला सुपरफ्लॉप

admin by admin
September 24, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
टेबलावरचा दुष्काळ आणि बांधावरची दडपशाही!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : लातूरमध्ये टाळ्या अन् वाहव्वा मिळवून निघालेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दुष्काळ पाहणीचा ताफा धाराशिवच्या हद्दीत घुसला आणि होत्याचं नव्हतं झालं! लातूर आणि सोलापुरात यशस्वी ठरलेला हा दौरा धाराशिवमध्ये थेट शेतकऱ्यांच्या संतापाच्या आगीत होरपळला. फडणवीसांच्या या संपूर्ण दौऱ्याचा फज्जा उडवण्याचं ‘श्रेय’ मात्र स्थानिक भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नियोजनशून्य कारभारालाच द्यावं लागेल, अशी उघड चर्चा आता खुद्द भाजपच्या गोटातूनच रंगू लागली आहे.

दुष्काळ पाहायचा की मर्जीतील कंत्राटदाराचं बिल काढायचं?

दौऱ्याची सुरुवातच अशा ‘अजब’ ठिकाणी करण्यात आली की अधिकाऱ्यांचे डोके चक्रावून गेले. करजखेडा येथे मुख्यमंत्र्यांना दाखवण्यासाठी जो स्पॉट निवडला, तो पाहून फडणवीसांनाही आश्चर्य वाटलं असावं. मुख्य रस्त्यापासून तब्बल सात-आठ किलोमीटर आत, खास तयार केलेल्या रस्त्यावरून नेऊन एका कोरड्या तळ्याची ‘पाहणी’ घडवून आणण्यात आली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजूबाजूला हिरवेगार रान दिसत होतं!

जवळच निम्न तेरणा प्रकल्पाचे काम सुरू आहे आणि हे काम राणा पाटलांच्या एका मर्जीतील कंत्राटदाराकडे असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. दुष्काळाच्या आडून या कंत्राटदाराचे अडकलेले बिल मार्गी लावण्यासाठीच हा हट्ट धरण्यात आला होता का? असा सवाल आता स्थानिक विचारत आहेत.

टेबलावरचा दुष्काळ मुंबईत नव्हता का दिसला?

यानंतर दौरा पोहोचला तो मलकापूरला. तिथे तर दुष्काळाची पाहणी म्हणजे केवळ ‘फोटोसेशन’चा फार्स ठरला. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतात चिखल-माती तुडवत जाण्याऐवजी, चक्क टेबलावर वाळलेलं सोयाबीन ठेवून मुख्यमंत्र्यांना दाखवण्यात आलं! हेच जर पाहायचं होतं, तर मुख्यमंत्र्यांना धाराशिवपर्यंत आणण्याची गरजच काय होती? दोन किलो सोयाबीन पार्सल करून थेट मंत्रालयात मुंबईला पाठवून दिलं असतं तरी चाललं असतं, अशा शब्दांत संतप्त शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

‘दुष्काळ जाहीर करा’च्या घोषणा अन् दमदाटीचा व्हायरल व्हिडिओ

दौऱ्यादरम्यान संतप्त शेतकऱ्यांनी थेट “आधी दुष्काळ जाहीर करा” अशा घोषणा देत फडणवीसांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची समजूत काढण्याऐवजी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी विरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांना दमदाटी आणि धक्काबुक्की करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून, यामुळे भाजपची प्रचंड नाचक्की झाली आहे.

विरोधकांना तुच्छ लेखणं आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणं या आमदारांच्या सवयीमुळे मुख्यमंत्र्यांची संपूर्ण धाराशिवची भेट म्हणजे एक ‘फ्लॉप शो’ ठरली, असं आता भाजपचे कार्यकर्तेच कपाळावर हात मारून बोलताना दिसत आहेत.

Previous Post

टेबलावरचा दुष्काळ आणि बांधावरची दडपशाही!

ताज्या बातम्या

टेबलावरचा दुष्काळ आणि बांधावरची दडपशाही!

धाराशिवमध्ये ‘दुष्काळ’ नव्हे, आमदारांच्या ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चीच पाहणी!

September 24, 2026
टेबलावरचा दुष्काळ आणि बांधावरची दडपशाही!

टेबलावरचा दुष्काळ आणि बांधावरची दडपशाही!

September 24, 2026
दुष्काळी पाहणी की फार्स?

दुष्काळी पाहणी की फार्स?

September 23, 2026
“त्यांचं मी तोंडही पाहत नाही, ती प्रवृत्तीच…”; मुख्यमंत्र्यांच्या गाडीतील प्रवासानंतर ओमराजेंचा राणा पाटलांवर घणाघात

“त्यांचं मी तोंडही पाहत नाही, ती प्रवृत्तीच…”; मुख्यमंत्र्यांच्या गाडीतील प्रवासानंतर ओमराजेंचा राणा पाटलांवर घणाघात

September 23, 2026
धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर

धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर

September 23, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये ‘दुष्काळ’ नव्हे, आमदारांच्या ‘इव्हेंट मॅनेजमेंट’चीच पाहणी!
  • टेबलावरचा दुष्काळ आणि बांधावरची दडपशाही!
  • दुष्काळी पाहणी की फार्स?
  • “त्यांचं मी तोंडही पाहत नाही, ती प्रवृत्तीच…”; मुख्यमंत्र्यांच्या गाडीतील प्रवासानंतर ओमराजेंचा राणा पाटलांवर घणाघात
  • धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!