• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, June 19, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

थरारक! तेरजवळील तेरणा धरणाच्या पुलावर एसटी बस पुलावरून नदीत पडता पडता वाचली

काळ आला होता पण वेळ आली नव्हती !

admin by admin
November 1, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
थरारक! तेरजवळील तेरणा धरणाच्या पुलावर एसटी बस पुलावरून नदीत पडता पडता वाचली
0
SHARES
11.2k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – तालुक्यातील तेरजवळील तेरणा धरणाच्या पुलावर गुरुवारी सकाळी ११.३० वाजता एका एसटी बसचा भीषण अपघात होण्याची शक्यता होती. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आणि बसमधील सर्व ६ प्रवासी सुखरूप बचावले.

तुळजापूर आगाराची एम एच १४ बीटी १६३९ क्रमांकाची सोलापूर-तेर-कळंब ही बस तेर येथून सकाळी कळंबच्या दिशेने निघाली होती. चालक काशीनाथ बोंदर आणि वाहक शोभा पवार यांच्यासह बसमध्ये इतर प्रवासी होती. तेरपासून अवघ्या ३ किमी अंतरावर तेरणा धरणाच्या पुलावर चालकाने डाव्या बाजूला वळण घेतले. त्याच वेळी अचानक बसचे स्टिअरिंग जाम झाले. त्यामुळे बस पुलाच्या लोखंडी कठड्याला धडकली.

सुदैवाने, चालक काशीनाथ बोंदर यांनी प्रसंगावधान राखत हँडब्रेक लावला. त्यामुळे २० फुटांवरून कोसळताना बस थांबली आणि मोठी दुर्घटना टळली. कठड्याला धडकल्याने बसचा पुढचा भाग थोडाफार दुखावला गेला. मात्र, सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती चालकाने दिली. बस कठड्यावर थांबताच चालकाच्या दरवाजातून प्रवासी तातडीने खाली उतरले.

“तेरणा धरणाच्या पुलावर डाव्या बाजूला वळण घेत असताना स्टिअरिंग जाम झाली. ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला, तरी बस पुलाखाली जात असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तातडीने हॅण्डब्रेक दाबला. तोपर्यंत बस कठड्याला धडकली होती. सर्व प्रवाशांना चालकाच्या दरवाजातून बाहेर काढले,” असे बसचालक काशीनाथ बोंदर यांनी सांगितले. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण होते.

Previous Post

उमरगा विधानसभा : राजेंद्र शेरखाने यांच्यासह चार उमेदवारांचे अर्ज नामंजूर

Next Post

तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; बेंबळी पोलिसात गुन्हा दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार; बेंबळी पोलिसात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

धाराशिव पोलिसांचा ‘शस्त्रधाऱ्यांना’ दणका! भूम, वाशी, आनंदनगर, आंबी आणि तामलवाडीत तलवारी अन् कोयत्यासह ५ जण जेरबंद

June 19, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

चोरट्यांचा सुळसुळाट! तुळजापुरातून स्कूटी गायब, तर सांजा शिवारातून सोलर पंप अन् वायर लंपास

June 19, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धाराशिव जिल्हा हादरला! तुळजापुरात भावाला ठार मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तर मुरुममध्ये लग्नाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक

June 19, 2026
“आम्ही कुठे शिवसेना सोडली? फक्त बॉस बदलला!”

“आम्ही कुठे शिवसेना सोडली? फक्त बॉस बदलला!”

June 19, 2026
कळंब भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार ३ हजारांची लाच घेताना रंगेहाथ; एसीबी धाराशिवची कारवाई

लाचखोर पोलिसाला संशय आल्याने ‘ट्रॅप’ हुकला, पण एसीबीचा दणका; छेडछाडीची तक्रार मिटवण्यासाठी ५ हजारांची लाच मागणाऱ्या शिराढोणच्या कॉन्स्टेबलवर गुन्हा!

June 18, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group