• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, July 26, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये जुने वाद विकोपास, लोखंडी रॉडने मारहाण; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
March 20, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
2.4k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात जुन्या वादातून हाणामारीचा प्रकार उघडकीस आला आहे. शालीमार कॉलनी शिंगोली येथील चार आरोपींनी एका व्यक्तीस लाथाबुक्यांनी आणि लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले. आरोपींविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी अनिकेत पाशुमिया शेख, पाशुमिया बाबुलाल शेख, आझाद पाशुमिया शेख (सर्व राहणार शालीमार कॉलनी शिंगोली) आणि रमेश पवार (राहणार सेवालाल कॉलनी धाराशिव) यांनी दि. 16 मार्च 2025 रोजी रात्री 9.30 वाजता पुलाजवळील शिंगोली रोड येथे अफजल इसुफ शेख (वय 40 वर्षे, राहणार शालीमार कॉलनी धाराशिव) यांच्यावर जुने भांडण कारणावरून हल्ला केला.

आरोपींनी अफजल शेख यांना शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच लोखंडी रॉडने हल्ला करून गंभीर जखमी केले. यावेळी त्यांनी जिवे ठार मारण्याची धमकीही दिली. जखमी अवस्थेत अफजल शेख यांनी दि. 19 मार्च 2025 रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

अफजल शेख यांच्या तक्रारीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आनंदनगर पोलीस ठाणे करीत आहे.

सुपारीच्या वादातून मारहाण; कोथळीत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

उमरगा – सुपारी उधार देण्याच्या वादातून कोथळी येथे एका व्यक्तीस मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी नितीन उमराव कांबळे (रा. कोथळी, ता. उमरगा, जि. धाराशिव) याने फिर्यादी श्रीशैल्य नेमिनाथ गुरव (वय 45 वर्षे, रा. कोथळी, ता. उमरगा, जि. धाराशिव) यांना दगडाने आणि लाथाबुक्यांनी मारहाण करत जखमी केले.

ही घटना दि. 19 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5.30 वाजता बसवेश्वर मंदिराजवळील पानटपरीसमोर घडली. सुपारी उधार देण्याच्या कारणावरून वाद वाढत गेला आणि आरोपी नितीन कांबळे याने श्रीशैल्य गुरव यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी आणि दगडाने मारहाण केली. यावेळी आरोपीने जिवे ठार मारण्याची धमकीही दिली.

जखमी झालेल्या श्रीशैल्य गुरव यांनी तातडीने मुरुम पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घटनेची माहिती दिली. त्यांच्या तक्रारीवरून मुरुम पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास मुरुम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Previous Post

धाराशिवमध्ये चोरीचा मोठा गुन्हा उघडकीस, 12 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

Next Post

लोकसभेत सहारा गुंतवणूकदारांच्या परतफेडीचा प्रश्न उपस्थित

Next Post
लोकसभेत सहारा गुंतवणूकदारांच्या परतफेडीचा प्रश्न उपस्थित

लोकसभेत सहारा गुंतवणूकदारांच्या परतफेडीचा प्रश्न उपस्थित

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना फसवू नका, तळतळाट ओढवून घेऊ नका…

“लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही”

July 26, 2026
सायबर फसवणुकीपासून मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

सायबर फसवणुकीपासून मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

July 26, 2026
वाशीत धक्कादायक प्रकार: उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यानेच शेतकऱ्याला ऊसाने झोडपले; विधानसभेत तीव्र पडसाद

धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्याचा तिढा: तांत्रिक निकष रद्द करून पीक कापणी प्रयोगाच्या आधारे भरपाई द्या

July 26, 2026
धाराशिव जिल्ह्यासाठी खरीप २०२५ पीक विमा मंजूर: ३३६ कोटींची भरपाई

पीक विम्याचा ‘कागदी’ खेळ: धाराशिवच्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या विमा कंपन्या आणि व्यवस्थेचा बळी!

July 25, 2026
धाराशिव जिल्ह्यासाठी खरीप २०२५ पीक विमा मंजूर: ३३६ कोटींची भरपाई

धाराशिव जिल्ह्यासाठी खरीप २०२५ पीक विमा मंजूर: ३३६ कोटींची भरपाई

July 25, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!