• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, July 27, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये चोरीचा मोठा गुन्हा उघडकीस, 12 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

admin by admin
March 20, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी
0
SHARES
958
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यात मालाविषयक गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कामगिरी केली आहे.  सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तीन आरोपींना अटक केली असून, एकूण 12.70 लाख रुपये किमतीचा चोरीचा माल जप्त केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे, पोहेकॉ विनोद जानराव, समाधान वाघमारे, पोना नितीन जाधवर, बबन जाधवर, चालक पोहेकॉ महेबुब अरब, पोअं विनायक दहीहंडे, पोअं प्रकाश बोईनवाड यांनी आरोपींचा शोध घेत पेट्रोलिंग सुरू ठेवले होते.

दरम्यान, गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, आनंदनगर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हा क्रमांक 111/2025 कलम 303(2) अन्वये दाखल गुन्ह्यातील आरोपी बेंबळी रोडवर थांबले असल्याचे कळले. पथकाने तत्काळ नमूद ठिकाणी धाव घेतली असता, आरोपी हणुमंत रामा बोडके (वय 24), निखील राजेंद्र मंजुळे (वय 21) आणि अरविंद बाबा क्षिरसागर (वय 21) हे मिळून आले.

प्रारंभी आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु अधिक विश्वासाने चौकशी केली असता, त्यांनी शिंदे कॉलेजजवळील वरुडा रोडवरील एका गोडाऊनमधून चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून अल्युमिनियम 55 एमएम धातूच्या ताराचे बंडल (एकूण वजन 200 किलो), पांढऱ्या रंगाचे पिकअप वाहन (क्रमांक MH 25 P 3808), बुलेट मोटरसायकल (क्रमांक MH 25 BB 0002) आणि यामाहा मोटरसायकल (क्रमांक MH 25 BD 1165) असा एकूण 12,70,000 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे आणि पथकातील अन्य सदस्यांनी केली. जप्त माल आणि आरोपी आनंदनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याने नारंगवाडीत तणाव, हिंदू संघटना आक्रमक

Next Post

धाराशिवमध्ये जुने वाद विकोपास, लोखंडी रॉडने मारहाण; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिवमध्ये जुने वाद विकोपास, लोखंडी रॉडने मारहाण; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

35 वर्षे पक्षात काम करणाऱ्या भाजप नेत्याला मंत्र्यांची भेट नाकारली?

35 वर्षे पक्षात काम करणाऱ्या भाजप नेत्याला मंत्र्यांची भेट नाकारली?

July 27, 2026
धाराशिव जिल्हा परिषदेला ग्रामविकास मंत्र्यांची केराची टोपली

धाराशिव जिल्हा परिषदेला ग्रामविकास मंत्र्यांची केराची टोपली

July 27, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

खोटे अपघात दाखवून विमा कंपन्यांना गंडा घालणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; उमरगा पोलिसांत धाव

July 27, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कळंब तालुक्यात वाटवडा-वडगाव रस्त्यावर दरोडा! पुलावर दांपत्याला अडवून सोन्याचे दागिने व मोबाईल लुटला

July 27, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

तुळजापुरात ढेकरी शिवारात पोलिसांची मोठी कारवाई! ९२ हजारांचा बंदीयुक्त गुटखा आणि दुचाकी जप्त

July 27, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!