• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, August 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

बार्शी व शिराळा उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडा…

 माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची जलसंपदा मंत्र्यांकडे मागणी

admin by admin
August 5, 2026
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
बार्शी व शिराळा उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडा…
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव |  उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असताना बार्शी उपसा सिंचन योजनेद्वारे चांदणी मध्यम प्रकल्पात तसेच शिराळा उपसा सिंचन योजनेतून परिसरातील पाझर तलावांमध्ये पाणी सोडण्याची मागणी भाजपा नेते तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

परंडा तालुक्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील चांदणी मध्यम प्रकल्पात सध्या शून्य टक्के पाणीसाठा असून प्रकल्प पूर्णपणे कोरडा पडला आहे. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पाण्याची आवकच झालेली नाही. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र दुष्काळाची भीती निर्माण झाली असल्याचे ठाकूर यांनी पत्रात नमूद केले आहे.

चांदणी मध्यम प्रकल्पातून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र प्रकल्प कोरडा पडल्याने बार्शी शहरालाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यापूर्वी बार्शी उपसा सिंचन योजनेतून चांदणी प्रकल्पात पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे सध्याही त्याच पद्धतीने पाणी उपलब्ध करून देणे शक्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सध्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. या पार्श्वभूमीवर उजनी धरणातून विसर्ग सुरू असतानाच बार्शी उपसा सिंचन योजनेद्वारे चांदणी मध्यम प्रकल्प भरावा तसेच शिराळा उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडून परिसरातील पाझर तलाव भरून घेण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला द्यावेत, अशी मागणी सुजितसिंह ठाकूर यांनी जलसंपदा मंत्र्यांकडे केली आहे.

 

Previous Post

तेरखेडा येथे तुफान दंगल अन् दगडफेक! पोलिसांवरच प्राणघातक हल्ला

Next Post

‘माऊली’च्या स्टेटसला ऐतिहासिक ‘दे दणादण’ आणि हायकमांडचा राणांना ‘रायगड’चा धक्का!

Next Post
राणा पाटील आणि त्यांच्या ‘बगलबच्चांना’ मुंबई आणि दिल्लीतून एकाच दिवशी दोन मोठे हादरवणारे झटके!

'माऊली'च्या स्टेटसला ऐतिहासिक 'दे दणादण' आणि हायकमांडचा राणांना 'रायगड'चा धक्का!

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

२४० कोटींचा नवा ‘महाल’, १४ कोटींचे थकीत भाडे आणि मोक्याच्या जागेवर बांधा-वापरा-हडपा (BOT) चा डाव!

August 10, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

१.१५ कोटींचा कोरोना निधी: ११ बैठका, शून्य निर्णय आणि गुरुजींचा संताप!

August 10, 2026
धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा : कोणते अधिकारी निलंबित?

धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा: १४ अधिकाऱ्यांचे निलंबन, मात्र २९ शेतकरी उत्पादक आणि २ निर्मिती कंपन्यांना ‘राजाश्रय’

August 10, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

३६ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई द्या

August 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कळंब बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन लंपास

August 9, 2026

Recent Posts

  • २४० कोटींचा नवा ‘महाल’, १४ कोटींचे थकीत भाडे आणि मोक्याच्या जागेवर बांधा-वापरा-हडपा (BOT) चा डाव!
  • १.१५ कोटींचा कोरोना निधी: ११ बैठका, शून्य निर्णय आणि गुरुजींचा संताप!
  • धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा: १४ अधिकाऱ्यांचे निलंबन, मात्र २९ शेतकरी उत्पादक आणि २ निर्मिती कंपन्यांना ‘राजाश्रय’
  • ३६ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई द्या
  • कळंब बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन लंपास
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!