• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, August 31, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

मतदारांच्या घरी जाण्याऐवजी पक्ष कार्यालयात SIR चे काम? भाजपची चौकशीची मागणी

admin by admin
July 14, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

Version 1.0.0

0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : धाराशिव शहरातील मतदार यादी भाग क्रमांक 333 मधील बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) यांनी एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात बसून SIR चे काम केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. संबंधित BLO यांनी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन करून कर्तव्यात कसूर केल्याचा दावा करत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी भाजपने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.

भाजपचे जिल्हा सरचिटणीस अॅड. नितीन भोसले आणि धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघाचे BLA-1 अॅड. दत्तात्रय देवळकर यांनी सोमवारी (दि. 14 जुलै) याबाबत निवेदन दिले आहे.

धाराशिव शहरात SIR अंतर्गत फॉर्मचे वितरण करणे आणि मतदारांकडून फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया निवडणूक विभागाकडून राबविली जात आहे. या प्रक्रियेत BLO यांनी संबंधित मतदारांच्या घरी जाऊन फॉर्म देणे आणि भरून घेणे अपेक्षित असल्याचे भाजपने निवेदनात म्हटले आहे. यामुळे मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी नियमानुसार होण्यास मदत होते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मात्र, धाराशिव शहरातील मतदार यादी भाग क्रमांक 333 मधील BLO सय्यद जुनेद कादरी हे एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात बसून SIR चे काम करत असल्याचे निदर्शनास आल्याचा आरोप भाजपने केला आहे. यासंदर्भातील बातम्या वर्तमानपत्रांत प्रसिद्ध झाल्या असून समाजमाध्यमांवरही व्हिडिओ प्रसारित झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.

संबंधित BLO यांनी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित असताना तसे होताना दिसत नसल्याचा दावा भाजपने केला आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन न करता एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात बसून काम केल्यामुळे संबंधित अधिकाऱ्याने कर्तव्यात कसूर केल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.

“अशा पद्धतीने काम झाल्यास चुकीची मतदार नोंदणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संबंधित BLO वर योग्य ती कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अॅड. नितीन भोसले आणि  अॅड. दत्तात्रय देवळकर यांनी केली आहे.

 

Previous Post

शेतकऱ्यांचा विजय! विमा कंपनीचे अपील केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीने फेटाळले

Next Post

तुळजापूर-लातूर रोडवर भीषण अपघात! रॉंग साईडने आलेल्या अर्टिगा कारने दुचाकीला उडवले

Next Post
काक्रंबा पाटीजवळ भीषण अपघात : टेम्पो पुलाच्या कठड्याला धडकला; चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, सात जण जखमी

तुळजापूर-लातूर रोडवर भीषण अपघात! रॉंग साईडने आलेल्या अर्टिगा कारने दुचाकीला उडवले

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेत पुण्याच्या महिला भाविकाचे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास सोन्याचे दागिने लंपास

August 29, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर : जुन्या बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत धाराशिवच्या महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण लंपास

August 29, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

काळनिंबाळा : भिक्षा मागण्याच्या बहाण्याने घरात शिरले अन् सुऱ्याचा धाक दाखवून पावणे सहा लाखांचा ऐवज लुटला

August 29, 2026
श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेटची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर

श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेटची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर

August 29, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

धाराशिव : मध्यरात्री अंधारात दबा धरून बसलेल्या संशयिताला आनंदनगर पोलिसांकडून बेड्या; चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय

August 28, 2026

Recent Posts

  • तुळजापूर : तुळजाभवानी मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेत पुण्याच्या महिला भाविकाचे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास सोन्याचे दागिने लंपास
  • तुळजापूर : जुन्या बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत धाराशिवच्या महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण लंपास
  • काळनिंबाळा : भिक्षा मागण्याच्या बहाण्याने घरात शिरले अन् सुऱ्याचा धाक दाखवून पावणे सहा लाखांचा ऐवज लुटला
  • श्री सिद्धिविनायक मल्टीस्टेटची १५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; सभासदांना १३ टक्के लाभांश जाहीर
  • धाराशिव : मध्यरात्री अंधारात दबा धरून बसलेल्या संशयिताला आनंदनगर पोलिसांकडून बेड्या; चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!