• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, August 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव भाजपचे ‘कुरुक्षेत्र’: कमळाच्या बागेत ‘प्रायव्हेट लिमिटेड’चा राडा!

admin by admin
August 3, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
धाराशिव भाजपचे ‘कुरुक्षेत्र’: कमळाच्या बागेत ‘प्रायव्हेट लिमिटेड’चा राडा!
0
SHARES
168
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिवमध्ये रविवारी भाजपचे नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांच्या सत्काराचा कार्यक्रम होता. पण सत्कार तर बाजूलाच राहिला आणि जुन्या निष्ठावंतांनी आपल्याच पक्षातील ‘नव्या’ नेत्यांची अशी काही पिसे काढली की विचारूच नका! निमित्त होतं सत्काराचं, पण प्रत्यक्षात तो तुळजापूरचे आमदार राणा पाटील यांच्या नावे ‘बोटे मोडण्याचा’ महामेळावाच ठरला.

सत्काराच्या आडून ‘खदखद’ एक्स्प्रेस सुसाट!

कार्यक्रम रविवारी पार पडला, पण त्याचे झटके मात्र अजूनही सोशल मीडियावर बसत आहेत. आमदार राणा पाटील हे जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवर कसा अन्याय करत आहेत, याचा पाढा या मेळाव्यात जाहीरपणे वाचण्यात आला. प्रदेश सदस्य ॲड. अनिल काळे यांचा राणा पाटील यांनी अपमान केल्याने आधीच धुमसत असलेल्या निष्ठावंतांनी या मेळाव्याच्या निमित्ताने आपली भडास काढली. या ‘अँटी-राणा’ मोहिमेचे मुख्य सूत्रधार आणि आयोजक होते प्रदेश सदस्य ॲड. व्यंकट गुंड!

“भाजप काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे होय?”

या मेळाव्यात सर्वाधिक टाळ्या खाल्ल्या त्या माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या डायलॉगने. सुरुवातीपासून पक्षात पक्के पाय रोवून असलेल्या ठाकूर यांनी थेट बाण सोडताना म्हटले, “भाजप हा पक्ष म्हणजे कोणती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही! तो कोण्या एका कुटुंबाचाही नाही, तर तो सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आहे.” हा अप्रत्यक्ष टोला राणा पाटील यांच्या वर्मी लागला नसता तरच नवल! या एका वाक्याने धाराशिव भाजपमध्ये ‘राणा पाटील यांचा नवा गट’ विरुद्ध ‘सुजितसिंह ठाकूर यांचा निष्ठावंत गट’ अशी अधिकृत फाळणी झाल्याचे शिक्कामोर्तब झाले.

घरचा कार्यक्रम, पण ‘हिरो’ ठरले शेजारचे!

या मेळाव्यातील सर्वात मोठा ‘ट्विस्ट’ म्हणजे प्रमुख पाहुणे! भाजपच्या निष्ठावंतांच्या या घरगुती कार्यक्रमात मानाचे पान कुणाला दिले असेल? तर राणा पाटील यांचे कट्टर राजकीय वैरी आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना! “दुसऱ्याच्या लग्नात नाचायला काय जातंय” या उक्तीप्रमाणे ओमराजे यांनी या व्यासपीठाचा पुरेपूर फायदा घेत राणा पाटील यांच्यावर यथेच्छ हल्लाबोल केला. भाजपच्या मंचावरून भाजपच्याच आमदाराला धुतले जाण्याचा हा दुर्मिळ योग उपस्थितांसाठी मनोरंजनाची पर्वणीच ठरला.

सोशल मीडियावर ‘ग्रामपंचायत’ची उजळणी

इकडे मेळावा संपला आणि तिकडे राणा पाटील समर्थकांनी सोशल मीडियावर तोफा डागायला सुरुवात केली. “आमदार साहेबांमुळेच भाजप जिल्ह्यात पाय रोवत आहे,” असा दावा करत त्यांनी जुन्या निष्ठावंतांचे ‘रिपोर्ट कार्ड’च मागायला सुरुवात केली.

  • “अनिल काळे यांनी स्वतःची ग्रामपंचायत तरी निवडून आणली का?”

  • “ठाकूर यांनी परंडा नगरपरिषदेत, पंचायत समितीत किंवा झेडपीत किती सदस्य निवडून आणले?”

    असे खडे सवाल विचारले जात आहेत. तर आयोजक ॲड. व्यंकट गुंड यांच्यावर “सगळे पक्ष फिरून आलेले आता भाजपमध्ये येऊन आम्हाला निष्ठा शिकवणार का?” अशी बोचरी टीका केली जात आहे.

शेवट गोड… (अर्थात विरोधकांसाठी!)

भाजपच्या या अंतर्गत ‘वॉर आणि प्रतिवॉर’मध्ये सर्वाधिक मजा कोण घेत असेल, तर ते अर्थातच विरोधक. खासदार ओमराजे निंबाळकर यांचे कट्टर समर्थक आणि माजी नगरसेवक सोमनाथ गुरव यांनी या संपूर्ण राड्यावर एक मार्मिक फेसबुक पोस्ट केली. सोशल मीडियावरील भाजपची ही जुंपलेली लढाई पाहून गुरव यांनी मजेत लिहिले,

“फेसबुकवरच्या पोस्ट बघून कालचा कार्यक्रम सार्थकी लागला असं वाटतंय 😂 तीर सही निशाने पे लगा 🏹🔥”

थोडक्यात काय, तर धाराशिवच्या राजकीय आखाड्यात कमळाच्या बागेत सध्या ‘निष्ठा’ आणि ‘प्रायव्हेट लिमिटेड’ या शब्दांवरून तुंबळ युद्ध सुरू आहे आणि बघ्यांच्या मात्र चांगल्याच उड्या पडत आहेत!

Previous Post

धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’ (पार्ट २): ‘बिनविरोध’च्या नाटकामागील शकुनीमामा आणि देवाभाऊंची ‘तिसरी नजर’!

ताज्या बातम्या

धाराशिव भाजपचे ‘कुरुक्षेत्र’: कमळाच्या बागेत ‘प्रायव्हेट लिमिटेड’चा राडा!

धाराशिव भाजपचे ‘कुरुक्षेत्र’: कमळाच्या बागेत ‘प्रायव्हेट लिमिटेड’चा राडा!

August 3, 2026
धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’: कमळात फुललाय पाटलांचा ‘वन मॅन शो’ की निष्ठावंतांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’ (पार्ट २): ‘बिनविरोध’च्या नाटकामागील शकुनीमामा आणि देवाभाऊंची ‘तिसरी नजर’!

August 2, 2026
धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’: कमळात फुललाय पाटलांचा ‘वन मॅन शो’ की निष्ठावंतांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

धाराशिवचा ‘गेम ऑफ थ्रोन्स’: कमळात फुललाय पाटलांचा ‘वन मॅन शो’ की निष्ठावंतांचा ‘करेक्ट कार्यक्रम’?

August 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात तीन मोटारसायकली चोरीला; तीन पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

August 2, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

लोहारा तालुक्यातील अचलेर तांड्यावर तुफान राडा! सोलापूरच्या तरुणाला दगड अन् बाभळीच्या काटेरी झुडपाने मारहाण

August 2, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!