• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, July 11, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

जिल्ह्यात गुन्हेगारीचे सत्र सुरूच: महिलेला चाकूचा धाक दाखवून दीड लाखांचे दागिने लुटले

घरफोडी, केबल चोरी आणि चालत्या वाहनातून माल पळवल्याच्या घटनांनी नागरिक त्रस्त

admin by admin
May 21, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
202
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जबरी चोरी, घरफोडी आणि केबल चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. परंडा तालुक्यात भरदिवसा एका महिलेला चाकूचा धाक दाखवून दीड लाखांचे दागिने लुटण्यात आले. तर तुळजापूर, लोहारा आणि धाराशिव ग्रामीण भागातही चोरीच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

१. गळ्याला चाकू लावून महिलेला लुटले (आंबी पोलीस ठाणे)

परंडा तालुक्यातील पांढरेवाडी शिवारात मोहिते वस्तीजवळील कॅनॉलच्या रोडवर एका महिलेला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. २०) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. मोहिनी संदीप पवार (वय ३०, रा. पांढरेवाडी) या शिवारातून लाकडे घेऊन पायी जात होत्या. यावेळी आरोपी लोल्या पिंटू काळे आणि इतर दोन अनोळखी इसमांनी त्यांना गाठले. त्यांच्या भोवती रिंगण करून एकाने त्यांच्या गळ्याला चाकू लावला. चाकूचा धाक दाखवून आरोपींनी त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे सोन्याचे गंठण व एक तोळ्याचे सोन्याचे फुले-झुबे असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला. याप्रकरणी मोहिनी पवार यांच्या फिर्यादीवरून आंबी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(६), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२. बोरगावात सव्वा लाखांची घरफोडी (नळदुर्ग पोलीस ठाणे)

तुळजापूर तालुक्यातील बोरगाव येथे एका घराचे कडी-कोंडा तोडून चोरट्यांनी १ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लांबवला. ही घटना मंगळवारी (ता. १९) मध्यरात्री एक ते सकाळी सातच्या दरम्यान घडली. आप्पाराव शिवाजी मुळे (वय ६२) यांच्या घरातील ४० हजार रुपयांची रोख रक्कम आणि ७५ हजार रुपयांचे चांदीचे दागिने असा ऐवज चोरीला गेला आहे. या प्रकरणी मुळे यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३३१(४), ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३. शेतातून ४० हजारांची केबल चोरी (लोहारा पोलीस ठाणे)

लोहारा तालुक्यातील तावशीगड शिवारात बालाजी मोहन पाटील (वय ३१, रा. माडज, ता. उमरगा) यांच्या शेतातून ४० हजार रुपये किमतीची केबल अज्ञातांनी चोरून नेली. त्यांच्या शेतातील (गट नं. ११३, ११९/१/१, २७/२/२, २७/२/४) पाच इलेक्ट्रिक पोलवरील ईक्को पँथर कंपनीची १४७० मीटर ॲल्युमिनियम केबल चोरट्यांनी कापून नेली. याप्रकरणी गुरुवारी (ता. २१) लोहारा पोलिसांत भा.न्या.सं. ३०३(२) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

४. सोलर प्लांटमधून ९० हजारांची केबल गायब (नळदुर्ग पोलीस ठाणे)

तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथील उस्मानाबाद सोलार एनर्जी लिमिटेड कंपनीच्या प्लांटमधून ९० हजार रुपये किमतीची २४२ मीटर केबल चोरट्यांनी पळवली. ही घटना मंगळवारी (ता. १९) मध्यरात्री घडली. सुपरवायझर नजीर मुबारक शेख (वय ३८, रा. चिकुंद्रा) यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी (ता. २१) नळदुर्ग पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

५. चालत्या गाडीतून कपड्यांचे गठ्ठे पळवले (धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे)

बार्शी-येडशी रोडवर घाट चढत असताना चालत्या वाहनातून माल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. आकाश बाळासाहेब काळे (वय २६, रा. खोमनाळा, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) यांची टाटा इंट्रा गाडी (एमएच १३ ई. पी. २५५४) येडशीकडे जात असताना अज्ञातांनी गाडीतील ३० हजार ८६९ रुपये किमतीचे ५ कपड्यांचे डाग (गठ्ठे) काढून नेले. याप्रकरणी गुरुवारी (ता. २१) धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

जागेच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; आठ जणांवर गुन्हा दाखल

Next Post

सामाईक बोअरवेलच्या मोटारीच्या वादातून सख्या भावाची निर्घृण हत्या

Next Post
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

सामाईक बोअरवेलच्या मोटारीच्या वादातून सख्या भावाची निर्घृण हत्या

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

भूम शहरात तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला!

July 11, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंड्यात ‘उपोषणाचा अर्ज’ दिल्याच्या रागातून घरावार जीवघेणा हल्ला!

July 11, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

कळंब तालुक्यात सावकारी त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या! हावरगाव शिवारात लिंबाच्या झाडाला घेतला गळफास; कोल्हे दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल

July 11, 2026
धाराशिव पीक विमा: उच्च न्यायालयाच्या निकालाने शेतकऱ्यांना धक्का, कंपनीला दिलासा

हरवलेल्या विवाहित महिलेला शोधून न्यायालयात हजर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

July 10, 2026
‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’

‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’

July 10, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group